ETV Bharat / city

पंचगंगा परिक्रमा पदयात्रेत राजू शेट्टींचा सरकारला 'हा' इशारा; विधानपरिषदेच्या जागेबाबत म्हणाले... - कोल्हापूर महापूर नुकसान भरपाई

आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर, नृसिंहवाडी येथील पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगमामध्ये हजारो शेतकऱ्यांसह उडी घेणार आहोत. जलसमाधी आंदोलन करू, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

राजू शेट्टी
राजू शेट्टी
author img

By

Published : Sep 2, 2021, 3:36 PM IST

Updated : Sep 2, 2021, 10:42 PM IST

कोल्हापूर - पुरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकरी पंचगंगा परिक्रमा पदयात्रेत सहभागी झाले आहेत. राज्यपालांकडे देण्यात आलेल्या 12 जागांच्या यादीतून शेट्टी यांचे नाव वगळण्यात आल्याच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

बुधवारपासून पंचगंगा परिक्रमा पदयात्रेला सुरूवात झाली आहे. हालोंडी या गावात ही पदयात्रा गुरुवारी पोहोचली आहे. दुसऱ्या दिवस होत आला तरी सरकारकडून अद्याप कोणीही राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधला नाही. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर, नृसिंहवाडी येथील पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगमामध्ये हजारो शेतकऱ्यांसह उडी घेऊन जलसमाधी आंदोलन करणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

पंचगंगा परिक्रमा पदयात्रा
पंचगंगा परिक्रमा पदयात्रा

हेही वाचा-भारत-पाक सीमेवरून घुसखोरी करणाऱ्याला तस्कराला बीएसएफकडून अटक

समझोत्यानुसार विधानपरिषदेची एक जागा द्यायची राष्ट्रवादीची जबाबदारी

पंचगंगा परिक्रमा पदयात्रेत राजू शेट्टींचा सरकारला 'हा' इशारा
राजू शेट्टी म्हणाले, की लोकसभा निवडणुकीपूर्वीच विविध विषयांवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी चर्चा झाली होती. त्यावेळी लोकसभेच्या जागावाटपाबाबतही चर्चा झाली होती. त्यानंतर विधानपरिषदेची निवडणूक झाली. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आले. त्यामुळे आमचा ज्या गोष्टीवर समजोता झाला होता, त्यावर राष्ट्रवादीकडून स्वाभिमानीला विधानपरिषदेसाठी एक जागा जाहीर केली. त्यावेळी आपण स्वतः बारामती येथे जाऊन शरद पवार यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी शरद पवार यांनी राजू शेट्टींनी ही जागा स्वीकारावी, अशी अट घातली होती. त्यानुसार आम्ही त्यांची भेट घेऊन परतलो होतो. त्यानंतर आजपर्यंत एकदाही या जागेबाबत काय झाले, याची चौकशी आम्ही केली नाही. आम्हाला सध्या त्यामध्ये काहीही रससुद्धा नाही. मात्र, समझोत्यानुसार विधानपरिषदेची एक जागा द्यायची राष्ट्रवादीची जबाबदारी आहे. मात्र, नाही दिली तरी आम्हाला फार मोठा फरक पडणार नाही, असेही राजू शेट्टी यांनी म्हटले. सध्या या चर्चा आम्हाला केवळ माध्यमांद्वारे कानावर पडत आहेत. पुढे काय होते, ते पाहू असेही म्हणायला शेतकरी नेते शेट्टी विसरले नाहीत. मेघोली तलाव दुर्घटनेनंतर शेट्टी संतापले, म्हणाले...दरम्यान, राजू शेट्टी यांनी भुदरगड तालुक्यातील मेघोली तलाव दुर्घटनेवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, घडलेली दुर्घटना अतिशय दुःखद आहे. काही दिवसांपूर्वी असेच एक धरण फुटले होते. मात्र एका नेत्याने हे धरण खेकड्यांनी पोखरल्याने फुटल्याची अजब प्रतिक्रिया दिली होती. आता मेघोली तलाव नेमके खेकड्यामुळे फुटले की बेडकांमुळे याबाबत सरकारकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते, याबाबत वाट पाहणार आहोत. हेही वाचा-World War II : दुसऱ्या महायुद्धाला आज 76 वर्ष पूर्ण; आढावा घेणारी ही विशेष स्टोरी...

सरकारी मदतीसाठी पदयात्रेचे आयोजन

कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. यामध्ये शेतकरी, व्यापारी, उद्योजक, कामगार, कष्टकरी, शेतमजूर आदींचे खूप मोठे नुकसान झाले आहे. सरकारने पूरग्रस्तांना तातडीने मदत न करता केवळ वेळकाढूपणाचे धोरण राबवत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना फसवू नका असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पूरग्रस्त शेतकऱ्यांसह पदयात्रेचे आयोजन केले आहे.

Last Updated : Sep 2, 2021, 10:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.