कोल्हापूर - शहरातील संभाजीनगर परिसरातील वारे वसाहतमध्ये पूर्ववैमनस्यातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. तलवार व इतर धारदार शस्त्राचा वापर या हल्ल्यात ( Sword Attack in Kolhapur ) करण्यात आला. यात चार जण जखमी झाले ( Injured in Sword Attack ) आहेत. ही घटना शनिवारी (दि. 5 फेब्रुवारी) दुपारच्या सुमारास घडली. या प्रकारामुळे वारे वसाहतीत तणावपूर्ण शांतता पसरली आहे.
पृथ्वी विलास आवळे ( वय 20 वर्षे), सुजल कांबळे (वय 21 वर्षे), दादासो किशोर माने ( वय 30 वर्षे) व रूपाली विलास सावळे (वय 40 वर्षे, सर्व रा.वारे वसाहत, संभाजी नगर, कोल्हापूर), अशी जखमींची नावे आहेत. या सर्व जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल ( CPR Hospital Kolhapur ) करण्यात आले आहे. त्यापैकी पृथ्वी आवळे याच्या पाठीत धारदार शस्त्राने खोलवर वार झाल्याने त्याची प्रकृती गंभीर आहे. ही घटना एकाने मोबाईलमध्ये कैद केली असून त्या व्हिडिओद्वारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र, मागील काही महिन्यांपासून कोल्हापूर शहरातील गुन्ह्यात वाढ होत आहे. तसेच शस्त्र वापरण्याचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे पोलीस प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
चार-पाच दिवसांपूर्वी झाला होता वाद - याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दोन गटात राडा - मागील चार ते पाच दिवसांपूर्वी एका कॉलेजवर पारंपारिक दिवस ( Traditional Day ) साजरा झाला होता. यावेळी तेथे काही कारणास्तव वारे वसाहतीतील दोन गटाच्या युवकात वादावादी झाली होती. याच घटनेच्या वैमनस्यातून आज दुपारी वारे वसाहत येथे राडा झाला. एका गट एकत्र येत हातात तलवारी व मोठा कोयता या सारखे धारदार शस्त्रे घेऊन ( Injured in Sword Attack ) गाडीवर येत संजय आवळे यांच्या घरावर हल्ला करत घरात घुसून साहित्याची तोडफोड केली. पृथ्वी आवळे या युवकाच्या पाठीत धारदार शस्त्राने वार केला. त्याचक्षणी तेथे आवळे गटातील समर्थक ही एकत्र आल्याने दोन्ही गटात सशस्त्र राडा सुरू झाला. घटनेनंतर सर्व जखमींना सीपीआरमध्ये दाखल ( CPR Hospital Kolhapur ) करण्यात आले. यामुळे सीपीआर परिसरातही तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलीस घटनास्थळी दाखल - सीपीआर परिसरात अगोदरच पोलीस हजर होते. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव हे देखील सीपीआरमध्ये दाखल ( CPR Hospital Kolhapur ) झाले. तसेच एका पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा सुरू केला असल्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी माध्यमांसमोर सांगितले.