कोल्हापूर - आयसीस या दहशतवादी संघटनेशी संबधित प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएने देशातील 6 राज्यात हे झापे टाकले आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि नांदेडमध्ये छापा टाकला आहे. कोल्हापूरमध्ये टाकण्यात आलेल्या छाप्यात दोघांना ताब्यात घेतले आहे. पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली ( NIA Raid In Kolhapur ) आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील हुपरी येथे एनआयएने ही छापेमारी केली. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ही छाप टाकण्यात आली. त्यामध्ये दहशतवादी संघटनेशी संबंधित दोघांवर कारवाई करत ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावं अद्याप समोर आली नाही आहे.
-
NIA Conducts Searches at Multiple Locations in 6 States into the Activities of ISIS Module Case (RC-26/2022/NIA-DLI) pic.twitter.com/AdY6Lz63Sn
— NIA India (@NIA_India) July 31, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">NIA Conducts Searches at Multiple Locations in 6 States into the Activities of ISIS Module Case (RC-26/2022/NIA-DLI) pic.twitter.com/AdY6Lz63Sn
— NIA India (@NIA_India) July 31, 2022NIA Conducts Searches at Multiple Locations in 6 States into the Activities of ISIS Module Case (RC-26/2022/NIA-DLI) pic.twitter.com/AdY6Lz63Sn
— NIA India (@NIA_India) July 31, 2022
एनआयएनच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबतची माहिती दिली आहे. त्यानुसार मध्यप्रदेशातील भोपाल आणि रायसेन जिल्ह्यात छापे टाकले आहेत. गुजरातमधील भडौच, सूरत, नवसारी आणि अमदाबाद येथे कारवाई करण्यात आली आहे. बिहारमध्ये अररिया, कर्नाटकमधील भटकल आणि तुमकुर जिल्ह्यात छापा टाकण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमधील देवबंदमध्ये आणि महाराष्ट्रातील कोल्हापूर, नांदेड येथे एनआयएने छापेमारी टाकत कारवाई केली आहे.
हेही वाचा - WHAT IS ED : भल्या भल्यांना धडकी भरवणारी काय आहे 'ईडी'