कोल्हापूर - वाढत्या महागाईच्या विरोधात कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( NCP Agitation Aginst Infliation ) आक्रमक झाला आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वाढलेल्या महागाईच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ऐतिहासिक दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला.
मुश्रीफांची केंद्रावर टीका - पेट्रोल, डिझेल, सीएनजीचे तसेच गॅसचे दर गेल्या काही दिवसांत गगनाला भिडले आहेत. याला विरोध करत निषेध व्यक्त करण्यासाठी आज हा लक्षवेधी मोर्चा काढण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकताच महिलांनी चुली पेटवून त्याठिकाणी झुणका-भाकर केली. तसेच ती झुणका-भाकर ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी खात केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. दरम्यान, वाढत्या इंधनाच्या दरामुळे आंदोलनात बैलगाडी हातांनी ओढत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणण्यात आले. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर ताशेरे ओढत मोदी सरकारवर टीका केली.
राष्ट्रवादीचा धडक मोर्चा - दिवसेंदिवस महागाईत वाढ होत असताना देशात पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. इंधनात CNG, PNJ, LPG गॅस दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. केंद्र सरकार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थित जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. हा मोर्चा दसरा चौक, खानविलकर पेट्रोल पंप मार्गे जिल्हाधिकारी यांच्यावर येऊन धडकला. दरम्यान, मोर्चा सभेत रूपांतरित झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच चुली मांडून पिठल भाकरी शिजवण्यात आले. तसेच मुश्रीफ यांच्यासह सर्वांनी ते खात निषेध व्यक्त केला.
हेही वाचा - Punyeshwar : ज्ञानवापीप्रमाणे पुण्यातही पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिरांच्या जागी दर्गा? मनसे लढा उभारणार