ETV Bharat / city

Vinayak Raut Criticized Eknath Shinde : फडणवीसांनी आज माइक ओढला, उद्या पॅन्ट ओढतील; विनायक राऊतांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

फडणवीसांनी आज शिंदेंचा माईक ओढला, उद्या पॅन्ट ओढून त्यांना नागडे करून टाकतील, अशा शब्दात विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Vinayak Raut criticized Chief Minister Eknath Shinde ) यांच्यावर टीका केली आहे. ते कोल्हापुरात शिवसेनेच्या मेळ्यात बोलत होते.

Vinayak Raut
Vinayak Raut
author img

By

Published : Jul 15, 2022, 8:15 PM IST

Updated : Jul 15, 2022, 8:42 PM IST

कोल्हापूर - देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्र्यांचा माईक ओढला, उद्या पॅन्ट ओढून त्यांना नागडे करून टाकतील, अशा शब्दात विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Vinayak Raut criticized Chief Minister Eknath Shinde ) यांच्यावर टीका केली आहे. शिवसेनेला लागलेल्या बंडखोर आमदारांच्या सुरुंगानंतर शिवसेना आता पुन्हा आपल्या पक्षाची मोर्चे बांधणी करत आहे. यानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात शिवसेनेचा मेळावा घेत कट्टर शिवसैनिकांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न सध्या शिवसेना करत आहे. आज ( शुक्रवारी ) कोल्हापुरात शिवसेनेचा मेळावा पार पडला यावेळी विनायक राऊत बोलत होते.

कोल्हापुरातील मेळाव्यात बोलताना खासदार विनायक राऊत

'शिंदेंनी देवेंद्र फडणवीससोबत जाऊन हिंदुत्वाचा मुर्दा पडला' : एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जात हिंदुत्वाचा मुर्दा पडला आहे. एकनाथ शिंदे यांना कपाळावर टिळा लावण्याचाही आता नैतिक अधिकार राहिलेला नाही. त्यांनी ठाकरे सरकारने संभाजीनगरचे नाव बदलण्याचा निर्णयाला स्थगिती दिली हे करताना एकनाथ शिंदे यांना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला हवी होती. लाचारी पत्करताना किमान दिघे साहेबांचे तरी स्मरण करायला हवे होता, असा टोलाही त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

'क्षीरसागर म्हणजे बेईमानीची लागलेली कीड' : एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळालेले राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावरही विनायक राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीतच बेईमानीची लागलेली कीड मी स्वतः अनुभवली होती. घरी जेवायला बोलावून खर्च दुसऱ्याकडून करायचा ही क्षीरसागरांची वृत्ती आहे. त्यांनी मला आणि नाना पटवले ना घरी घातलेल्या जेवणाचा खर्च हा काँग्रेसचे सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याकडून घेतले असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी त्यांच्यावर केला आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचेही त्यांनी खरपूस समाचार घेतला आहे. तर नारायण राणे आणि केसरकर हे येत्या काही दिवसात एकमेकांच्या जीवावर बसणार आणि तो दिवस जास्त लांब नाही, असे विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - Matoshri Doors: मातोश्रीचे दरवाजे आधी उघडले असते तर ही वेळ आली नसती -देवेंद्र फडणवीस

Last Updated : Jul 15, 2022, 8:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.