ETV Bharat / city

Kolhapur Children Vaccination : पहिल्याच दिवशी कोल्हापूरात 15 ते 18 वयोगटातील 'इतक्या' विद्यार्थ्यांचे लसीकरण

आजपासून जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील ( Kolahapur Children Vaccination ) विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. या वयोगटातील विद्यार्थ्यांचे त्यांच्या शाळेमध्ये तसेच कॉलेजमध्ये जाऊन आरोग्य विभागाने ( kolhapur 15 to 18 Age Group Vaccination ) लसीकरणाला सुरुवात केली आहे.

Kolhapur Children Vaccination
Kolhapur Children Vaccination
author img

By

Published : Jan 3, 2022, 9:09 PM IST

कोल्हापूर - कोरोना प्रादुर्भाव आणि ओमायक्रॉनचा संभाव्य धोका डोळ्यासमोर ठेऊन आजपासून जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील ( Kolahapur Children Vaccination ) विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. या वयोगटातील विद्यार्थ्यांचे त्यांच्या शाळेमध्ये तसेच कॉलेजमध्ये जाऊन आरोग्य विभागाने ( kolhapur 15 to 18 Age Group Vaccination ) लसीकरणाला सुरुवात केली आहे. आजच्या या पहिल्याच दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 9 हजार 318 विद्यार्थ्यांचे ( Today Children Vaccination kolhapur ) लसीकरण झाले आहे. जिल्हा लसीकरण अधिकारी फारूख देसाई यांनी याबाबत माहिती दिली.

2007 पूर्वी जन्मलेले लाभार्थी लसीकरणास पात्र -

आज सकाळपासून 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी या लसीकरणाची पाहणी केली. तसेच दिलेले लसीकरणाचे उद्दिष्ट येत्या काही दिवसांतच पूर्ण करण्याबाबत प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यात तब्बल 2 लाख 29 हजार इतके लाभार्थी आहेत. यामध्ये 28 हजार केवळ कोल्हापूर शहरातील असून सर्वांचे लवकरात लवकर लसीकरण व्हावे, यासाठी प्रशासनाने चांगल्या पद्धतीने नियोजन केले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सर्वच भागांतील शाळांमध्ये जाऊन लसीकरण होणार असून कोणीही लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन सुद्धा केले. यासाठी 2007 पूर्वी जन्मलेले लाभार्थीच लसीकरणास पात्र असणार आहेत.

कोणत्या तालुक्यात किती उद्दिष्ट यावर एक नजर -

1) आजरा - 6179
2) भुदरगड - 7696
3) चंदगड - 9596
4) गडहिंग्लज - 11590
5) गगनबावडा - 1831
6) हातकणंगले - 41825
7) कागल - 14155
8) करवीर - 25000
9) पन्हाळा - 13281
10) राधानगरी - 10221
11) शाहूवाडी - 9509
12) शिरोळ - 20146

असे एकूण 1 लाख 71 हजार 29 विद्यार्थ्यांचे पहिल्या टप्प्यात उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा - Mumbai Schools Closed : मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.