ETV Bharat / city

अपहरण झालेल्या 'त्या' व्यापाऱ्याचा खून; मृतदेह पुरून त्यावर ठवले होते दगड - दीपक हरीलाल पटेल हत्या प्रकरण

हातकणंगले मधील बेपत्ता ( Missing trader Deepak Harilal Patel case ) झालेल्या व्यापाऱ्याचा खून झाल्याचे काल बुधवारी उशिरा समोर आले आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तपास केला असता तब्बल 18 दिवसांनी पुरलेला मृतदेह ( Deepak Harilal Patel dead body ) पोलिसांना मिळाला.

trader Deepak Harilal Patel murder
दीपक हरीलाल पटेल हत्या प्रकरण
author img

By

Published : Apr 14, 2022, 2:14 PM IST

कोल्हापूर - हातकणंगले मधील बेपत्ता ( Missing trader Deepak Harilal Patel case ) झालेल्या व्यापाऱ्याचा खून झाल्याचे काल बुधवारी उशिरा समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तपास केला असता तब्बल 18 दिवसांनी पुरलेला मृतदेह ( Deepak Harilal Patel dead body ) पोलिसांना मिळाला. दीपक हरीलाल पटेल ( Trader Deepak Harilal Patel murder ) (वय 35) असे या टिंबर व्यापाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा खून 15 लाखांच्या खंडणीसाठी झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा - कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम हे राज्य सरकारचे; राज ठाकरेंच्या अल्टिमेटमला गृहराज्यमंत्र्याचे उत्तर

18 दिवसांपूर्वी दीपक पटेल हे बेपत्ता झाले होते. बेपत्ता झाल्यानंतर सलग दोन दिवस दिपक यांनी आपल्या घरच्यांना फोनद्वारे 15 लाख रुपयांची व्यवस्था करावी आणि माझी सुटका करावी, असे सांगितले होते. त्यानंतर त्यांचा फोन स्विच ऑफ येऊ लागला. घरच्यांनी याबाबत पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यांचे मोबाईल लोकेशन कर्नाटकातील सीमाभागात आढळले. आठ दिवसांपूर्वी त्यांचा मोबाईल बेळगाव सोलापूर या एसटी बसमध्ये सीटच्या खाली काही प्रवाशांना मिळाला होता. हा फोन हातकणंगले पोलिसांच्या हाती लागताच मोबाईलवरील कॉल डिटेल्सवरून तपासाची यंत्रणा गतिमान झाली. त्यानुसार पुढील तपास सुरू झाला.

संशयितांना ताब्यात घेऊन राधानगरी येथे तापस - दरम्यान पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले व त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राधानगरीमधील पाटपन्हाळा अभयारण्यात ते गेले. तिथे त्यांना संबंधित घटनास्थळ मिळाले. या ठिकाणी दीपक पटेल यांचा मृतदेह पुरून त्यावर दगड ठेवलेले आढळले. त्यानुसार येथील स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी रात्री उशिरा मृतदेह ताब्यात घेतला व त्यास सीपीआर रुग्णालयात आणण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी आता 4 संशयितांना ताब्यात घेतले असून, ते पूढील तपास करत आहेत. अद्याप संबंधितांची नावे जाहीर केलेली नाही.

हेही वाचा - Kolhapur North By-Election Voting : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 60.09 टक्के मतदान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.