कोल्हापूर - देशात महागाईचा विक्रम झाला असून, गेल्या 70 वर्षातील सर्वात जास्त महागाई आहे. यावर कोणी बोलू नये म्हणून भाजपला माहिती आहे की धर्माची गोळी दिली तर लोकं झोपून रहातात, म्हणून भाजप लोकांना गोळी देवून झोपवते. धर्माची गोळी देऊन महाराष्ट्रात वणवा पेटवायचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे, अशी टीका मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad on BJP in Kolhapur) यांनी भाजपवर केली आहे.
तसेच शरद पवार यांना प्रत्येक मुद्द्यात ओढून ताणून आणायचा प्रयत्न केला जातो. कारण त्यांना माहिती आहे धर्मांध शक्तींना रोखणारा एकच हिमालय आहे तो म्हणजे शरद पवार. गांधींना ज्या प्रमाणे बदनाम केले तसाच प्रयत्न शरद पवार यांच्याबाबतीत होत आहे, असेही आव्हाड म्हणाले. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
भाजप धर्माची गोळी देऊन वणवा पेटवत आहे - गेल्या अनेक दिवसापासून देशात प्रचंड प्रमानात महागाई वाढली आहे. याबाबत कोणीही बोलत नाही. मात्र, मी नेहमी बोलत असतो की महागाई ही 300 पटीने वाढली. आहे. हे गेल्या 70 वर्षात कधी नाही झाले. मात्र, यावर ते बोलत नाहीत. मात्र, भाजपकडून धर्माची गोळी देऊन वणवा पेटवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण 2 धर्मांत तेढ निर्माण झाल की लोक तिकडे वळतात म्हणून रोज नवीन धर्माची गोळी देण्यात येत असून, महाराष्ट्रातील लोकांना बेदुंध करण्याचे काम भाजप करत असल्याची टीका आव्हाड यांनी केली आहे.
धर्माचं राजकारण रोखणार एकच हिमालय - महाराष्ट्रातील धर्माच्या राजकारणाला रोखू शकणारा एकच हिमालय आहे ते म्हणजे शरद पवार. यामुळे त्यांना प्रत्येक प्रकरणात ओढून त्यांना बदनाम करायचे काम अनेक लोक करत आहेत. मात्र, या अगोदर महात्मा गांधीवरही अश्याच प्रकारचे आरोप करण्यात आले. मात्र, खरं कोणी बदलू शकत नाही. आपल्या बापाची बदनामी आम्ही सहन करणार नाही. हे सर्व त्यांच्या विरुद्ध षडयंत्र असून आम्ही त्याला बळी जाणार नाही. अजून ही जगातील सर्व नेते गांधीजीं समोर जाऊन नतमस्तक होतात. याच प्रमाणे जातीचे राजकारण हे फक्त शरद पवारच थोपवू शकतात. यामुळे त्यांना प्रत्येक प्रकरणात ओढून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
कोणी एकट्याने ठरवले म्हणून सरकार बनले नाही - काल कोल्हापुरात झालेल्या सभेत खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला चिमटे काढले होते. शिवसेनेला सोडून आमचे ठरले वगैरे केलात तर शिवसेना गप्प बसणार नाही हे सरकार शिवसेनेमुळे झाले आहे, असे राऊत म्हणले होते. मात्र, याला उत्तर देत जितेंद्र आव्हाड म्हणाले की, हे सरकार कोणी ऐकाने ठरवले म्हणून झाले नाही. सगळ्यांनी बसून ठरवले म्हणून झाले आणि हे सरकार बनवण्यासाठी शरद पवार यांचे मोठे योगदान आहे. बाकीच्यांनी मदत केली. मात्र, यापुढे आमचेच म्हणजे महविकास आघाडीचेच ठरणार, ते म्हणाले.
हेही वाचा - VIDEO: मंत्र्याला रस्ता मोकळा करून देताना पोलिसाने वाहनधारकावर उचलला हात