कोल्हापूर - शहरात सध्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व सुरू आहे. यानिमित्त शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शाहू मिल येथे चित्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे. आज ( सोमवारी ) या प्रदर्शनास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भेट दिली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कृतज्ञता पर्वाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राज ठाकरेंना घालून दिलेले नियम मोडले गेले असतील तर गृहविभाग तपासणी करून कायदेशीर कारवाई करतील. तसेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे नोटाबंदी सारखे भोंग्याचे देशभर एकच धोरण असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.
'फडणवीसांवर कारवाई करावी की नाही गृहविभाग ठरवणार' : काल मुंबई येथील सोमैया मैदानात झालेल्या बूस्टर सभेत फडणवीसांनी बाबरी मशिद आम्ही पाडली. मी तेथे होतो म्हणाले होते. यावर हसन मुश्रीफ बोलताना म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी काय विधान केले ते मला माहित नाही. मात्र आमचा गृहविभाग त्यांचे सगळे बोलणे तपासेल आणि कारवाई करायची की नाही ते ठरवेल. असेही ते म्हणाले.
'शरद पवारांना बदनाम केल्याशिवाय आपले काही चालणार नाही' : गेली ५५ ते ६० वर्ष शरद पवार राजकारणात आहेत आणि राज्याचे संपूर्ण राजकारण हे शरद पवार यांच्या भोवती फिरत राहिले आहे. म्हणून त्यांना बदनाम करण्याचा अजेंडा राज ठाकरे यांच्यासह विरोधकांनी घेतला असावा. मात्र पवार साहेब हे कोणाला घाबरणारे नाहीत. शिवाय विचारही सोडणारे नाहीत, असे मुश्रीफ म्हणाले आहेत. तसेच या वयात सुद्धा ते एक सेकंद सुद्धा कुठे थांबले नाहीत. कालच्या पुण्याच्या सभेतही उत्कृष्ट भाषण त्यांनी केले. मात्र शरद पवारांना बदनाम केल्याशिवाय आपले काही चालणार नाही, असे त्यांना वाटत असा टोलाही मुश्रीफांनी राज ठाकरेंना लगावला आहे.
हेही वाचा - Ajit Pawar Nashik : महाराष्ट्रात हुकूमशाही चालणार नाही; अजित पवारांनी राज ठाकरेंना सुनावले