ETV Bharat / city

'अपक्ष आमदारांना ''त्या'' देत होत्या कोट्यवधींची ऑफर'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन टॅपिंग प्रकरणासोबतच शुक्ला ज्या अपक्ष आमदारांना संपर्कात राहून ऑफर देत होत्या त्याचीसुद्धा चौकशी होणे गरजेचे असल्याचे मत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले आहे.

minister hasan mushrif
minister hasan mushrif
author img

By

Published : Mar 26, 2021, 2:59 PM IST

Updated : Mar 26, 2021, 8:26 PM IST

कोल्हापूर - रश्मी शुक्ला या अपक्ष आमदारांच्या संपर्कात होत्या. त्यांनी अनेक अधिकाऱ्यांना यासाठी कामाला लावले होते. कोट्यवधींची ऑफर त्या अपक्ष आमदारांना देत होत्या. पोलीस अधिकाऱ्यांचे हे कृत्य अतिशय चुकीचे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन टॅपिंग प्रकरणासोबतच शुक्ला ज्या अपक्ष आमदारांना संपर्कात राहून ऑफर देत होत्या त्याचीसुद्धा चौकशी होणे गरजेचे असल्याचे मत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

हेही वाचा - 'केंद्रीय तपास यंत्रणा कामाला लावून महाविकास आघाडीला अडचणीत आणण्याचा कट'

'सीडीआर जप्त करून ते तपासणे गरजेचे'

काही व्यक्ती समाजविघातक कृत्य करत आहेत. त्यामुळे त्यांच्या फोन टॅपिंगची परवानगी सीताराम कुंटे यांनी घेतली होती. मात्र मिळालेल्या परवानगीचा रश्मी शुक्ला यांनी गैरवापर केला असून थेट आमदारांचेच फोन टॅप केले असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले. शिवाय 24 ऑक्टोबर 2019 ते 24 नोव्हेंबर 2019पर्यंत शुक्ला यांच्या फोनचे सीडीआर जप्त करून त्यांचे अपक्ष आमदारांसोबत झालेले संभाषण तपासणे गरजेचे असून त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी, असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

'फडणवीस यांनी थयथयाट थांबवावा'

ते पुढे म्हणाले, की विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणीस यांनी एक अहवाल घेऊन मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. शिवाय मोठ्या थाटात त्यांनी हा अहवाल घेऊन दिल्लीला चाललो आहे, सांगत गृहसचिवांना तो दिला. मात्र अशी कोणतीही गोष्ट झालेली नाही हे सिद्ध झाले आहे. त्यानंतर कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनीसुद्धा पत्रकार परिषद घेतली. त्यामुळे फडणवीस आणि प्रसाद यांनी जनतेची माफी मागितली पाहिजे. त्यांनी महाराष्ट्राची बदनामी केली आहे. फडणवीस म्हणतात लूज बॉल आला तर सीमेपार टोला देतो, मात्र त्यांचा एकही बॉल सीमेपार गेला नाही. याउलट ते झेलबाद झाले, असा टोलाही देत आता त्यांनी सत्तेचे स्वप्न विसरून जावे, शिवाय त्यांचा हा सुरू असलेला थयथयाट थांबवावा, असेही त्यांनी म्हटले.

हेही वाचा - अविश्वास ठराव आणा, तिघांची आघाडी किती भक्कम ते समजेल - हसन मुश्रीफ

'दोन्हीचा तपास व्हावा'

अंबानींच्या घरासमोर कोणी स्फोटके ठेवली तसेच मनसुख हिरेन यांची हत्या कोणी केली हे तपासणे गरजेचे आहे. हा तपास भरकटून देण्यासाठी विरोधी पक्षाकडून सर्वकाही सुरू आहे. मात्र एटीएसने खरा तपास केला असता तर खरे मारेकरी आणि याच्यामागे कोण आहे, हे समोर आले असते, असेही मुश्रीफांनी म्हटले आहे.

Last Updated : Mar 26, 2021, 8:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.