कोल्हापूर : कोल्हापूर म्हंटलं की तांबडा पांढरा रस्सा हे एक समीकरणच आहे. दरवर्षी 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस कोल्हापूरकर मोठ्या उत्साहात साजरा करत असतात आणि नववर्षाचे स्वागत करत ( New Year Celebration In Hotel ) असतात. या दिवशी शहरातील सर्वच हॉटेल हाऊस फुल्ल असतात. मात्र कोरोनामुळे यंदाही 31 डिसेंबर साजरा करण्यावर निर्बंध लावण्यात आले ( Restrictions For 31st December Celebration ) आहेत. त्यामुळे हॉटेल व्या सायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं ( Hoteliers Loss Kolhapur ) आहे.
कोट्यवधींची उलाढाल यंदाही ठप्प
कोरोनामुळे सर्वच व्यवसाय उद्योगांवर मोठा परिणाम झाला ( Covid Impact On Businesses ) आहे. हॉटेल व्यवसायावर सुद्धा याचा मोठा परिणाम झाला आहे. कोरोनानंतर गेल्या चार महिन्यांपासून पुन्हा एकदा हॉटेल व्यवसाय पूर्ववत झाले होते. मात्र आता ओमायक्रोनचा प्रादुर्भाव वाढू नये ( Spread Of Omicron ) तसेच 31 डिसेंबर साजरा करताना गर्दी होऊ नये यासाठी नव्या मार्गदर्शक सूचना घालण्यात आल्या ( Government Covid guidelines ) आहेत. त्यानुसार रात्री 9 नंतर सर्वच हॉटेल बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याचा हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. दरवर्षी एकाच दिवशी कोट्यवधींची उलाढाल होत असते मात्र यावर्षीही फटका बसला आहे अशी प्रतिक्रिया येथील हॉटेल व्यावसायिकांनी दिली आहे.
मटण मार्केटवर सुद्धा परिणाम
दरम्यान रात्री 9 नंतर बंदी असल्याने अनेक बंधने आली आहेत. त्यामुळे यंदाचा 31 डिसेंबर साधेपणाने साजरा करावा लागत आहे. याचा परिणाम येथील मटण मार्केटवर ( Mutton Market Kolhapur ) सुद्धा पडल्याचे पाहायला मिळाला. सकाळपासून मटण मार्केटमध्ये खूपच कमी वर्दळ दिसून आली.