बेळगाव लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मंगला अंगडी यांनी विजय मिळवला आहे.
बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक : भाजपच्या मंगला अंगडी विजयी - महाराष्ट्र एकीकरण समिती
18:20 May 02
बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक निकाल : भाजपच्या मंगला अंगडी विजयी
17:35 May 02
बेळगावमध्ये 84 व्या फेरीअखेर भाजपने मारली मुसंडी
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत निकालाच्या 84 व्या फेरीअखेर भाजपने मुसंडी मारली असून 3 हजार 103 मतांनी आघाडी घेतली आहे. भाजपच्या मंगला अंगडी यांना 4 लाख 22 हजार 614 मते मिळाली तर काँग्रेसचे सतीश जारकीहोळी यांना 4 लाख 19 हजार 060 मते मिळाली आहेत. महाराष्ट्र एकिकरण समितीच्या शुभम शेळके यांना 1 लाख 24 हजार 233 मते मिळाली आहेत.
16:57 May 02
काँग्रेस 1 हजार 628 मतांनी आघाडीवर
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत 78 व्या फेरीअखेर काँग्रेसने 4 लाख 8 हजार 894 मते मिळवली आहे तर भाजपच्या मंगला अंगडी यांनी 4 लाख 7 हजार 266 मते मिळवली आहेत. महाराष्ट्र एकिकरण समितीच्या शुभम शेळके यांनी 1 लाख 24 हजार 233 मते मिळवली आहेत. 1 हजार 628 मतांनी काँग्रेसचे सतीश जारकीहोळी आघाडीवर आहेत.
16:29 May 02
काँग्रेस 4 हजार 60 मतांनी आघाडीवर
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत 72 व्या फेरीअखेर काँग्रेसने मुसंडी मारली असून काँग्रेसने 3 लाख 87 हजार 393 मते मिळवली आहेत तर भाजपने 3 लाख 83 हजार 333 मते मिळवली असून काँग्रेस 4 हजार 60 मतांनी आघाडीवर आहे.
16:01 May 02
काँग्रेस 7 हजार 163 मतांनी आघाडीवर
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने मुसंडी मारली असून काँग्रेसने3 लाख 60 हजार 968 मते मिळवली आहेत तर भाजपने 3 लाख 53 हजार 805 मते मिळवली असून महाराष्ट्र एकिकरण समितीने 1 लाख 1 हजार 913 मते मिळवली आहेत. काँग्रेस 7 हजार 163 मतांनी आघाडीवर आहे.
14:47 May 02
काँग्रेस 58 व्या फेरीअखेर 4 हजार 841 मतांची आघाडीवर
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांनी 3 लाख 3 हजार 153 मते मिळवली असून भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी यांना 2 लाख 89 हजार 312 तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना 89 हजार 836 मते मिळाली आहेत. 58 व्या फेरीअखेर काँग्रेसने 4 हजार 841 मतांची आघाडी मिळवली आहे.
14:07 May 02
50 व्या फेरीनंतर काँग्रेसचे जारकीहोळी आघाडीवर
काँग्रेसच्या सतीश जारकीहोळींनी पुन्हा आघाडी घेतली आहे. 50 व्या फेरीनंतर जारकीहोळी 10 हजार मतांनी आघाडीवर आले आहेत.
12:11 May 02
31 व्या फेरीनंतर मंगला अंगडींची आघाडी कायम
भाजपच्या मंगला अंगडींनी 31 व्या फेरीनंतर आघाडी कायम ठेवली आहे.
31 व्या फेरीनंतरची स्थिती
मंगला अंगडी - 1,57,892 मते
सतीश जारकीहोळी - 1,44,007 मते
शुभम शेळके - 41,600 मते
11:18 May 02
भाजपच्या मंगला अंगडी 10 हजार मतांनी आघाडीवर
बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक मतमोजणीची सकाळी अकरापर्यंतची स्थिती
भाजप मंगला अंगडी - 122714 मते
काँग्रेस सतीश जारकीहोळी - 111769 मते
समिती शुभम शेळके - 31322 मते
11:03 May 02
उमेदवारांना आतापर्यंत मिळालेली मते
बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक : उमेदवारांना आतापर्यंत मिळालेली मते
मंगल अंगडी - 1 लाख 5 हजार 852
सतीश जारकीहोळी - 96 हजार 482
शुभम शेळके - 26 हजार 955
10:34 May 02
चोविसाव्या फेरीअखेर मंगला अंगडींची आघाडी कायम
भाजपच्या मंगला अंगडींनी चोविसाव्या फेरीनंतर आघाडी कायम ठेवली आहे. त्या सहा हजार मतांनी आघाडीवर आहेत.
10:16 May 02
आघाडी-पिछाडीने मतमोजणीत चुरस
पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला बेळगाव शहरातील आरपीडी कॉलेजमध्ये प्रारंभ झाला असून सुरुवातीपासूनच मतमोजणी आघाडी-पिछाडी सुरू आहे. सुरुवातीला काही काळ काँग्रेसचे सतीश जारकीहोळी आघाडीवर होते. ही आघाडी काही काळ जारकीहोळी यांनी टिकवली. पण भाजपच्या मंगला अंगडी यांनी अडीच हजार मतांची आघाडी घेतली आहे. एकूण मतमोजणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून सतत चढ उतार निर्माण झाल्याने उत्सुकता शिगेला पोचली आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत कल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. सकाळी 9:50 पर्यन्त मंगला अंगडी यांना 48110 तर सतीश जारकीहोळी यांना 45091 मते तर शुभम शेळके यांना 14502 मते मिळाली आहे. एकूण 70 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे.
10:10 May 02
बावीसाव्या फेरीनंतर भाजपच्या मंगला अंगडी आघाडीवर
बावीसाव्या फेरीनंतर भाजपच्या मंगला अंगडी यांनी 2600 मतांची आघाडी घेतली आहे.
09:37 May 02
दहाव्या फेरीनंतरही सतीश जारकीहोळींची आघाडी कायम
मतमोजणीच्या दहाव्या फेरीनंतरही काँग्रेसच्या सतीश जारकीहोळींनी आघाडी कायम राखली आहे. ते सुमारे एक हजार मतांनी आघाडीवर आहेत.
09:20 May 02
सतीश जारकीहोळी साडेतीन हजार मतांनी आघाडीवर
मतमोजणीच्या सहाव्या फेरीनंतर काँग्रेसचे सतीश जारकीहोळी साडेतीन हजार मतांनी आघाडीवर आहेत.
09:06 May 02
पहिल्या कलात काँग्रेसचे सतीश जारकीहोळी आघाडीवर
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या हाती आलेल्या पहिल्या कलानुसार काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी हे आघाडीवर आहेत.
08:22 May 02
मतमोजणीला सुरूवात
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. निवडणूक निरीक्षक चंद्रभूषण त्रिपाठी आणि जिल्हाधिकारी हरीश कुमार यांच्या उपस्थितीत सकाळी 7:30 वाजता स्ट्रॉंग रुम उघडण्यात आला. आरपीडी कॉलेजमध्ये उभारलेल्या केंद्रावर मतमोजणी केली जात आहे.
06:13 May 02
बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक : भाजपच्या मंगला अंगडी विजयी
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळकेंच्या एन्ट्रीमुळे चुरशीच्या झालेल्या बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादामुळे विशेष महत्व प्राप्त झालेल्या या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचेच लक्ष लागून आहे. या निवडणुकीत बेळगावचा कौल कुणाला मिळणार याची उत्सुकता आता लागून राहिली आहे. मराठी अस्मितेमुळे महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या या निवडणुकीत मराठी मते निर्णायक ठरणार का हे निवडणूक निकालानंतरच कळेल.
तिरंगी लढत
काँग्रेससह भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून सतीश जारकीहोळी, भाजपकडून दिवंगत माजी खासदार सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी, तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्यात तिरंगी लढत बघायला मिळाली. या निवडणुकीत शिवसेनेने शुभम शेळकेंना पाठिंबा जाहीर केला होता. त्यांच्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बेळगावात प्रचार सभाही घेतली होती. त्यामुळे निवडणुकीतील चुरस आणखीनच वाढली होती. दरम्यान, सलग चार वेळा बेळगावचे खासदार राहिलेले केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे निधन झाल्याने बेळगावमध्ये लोकसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती.
मराठी भाषिकांची मते निर्णायक असणार..
बेळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण 8 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील 6 ठिकाणी भाजपाचे आमदार आहेत तर 2 ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत. यापूर्वी याठिकाणी महाराष्ट्रात एकीकरण समितीचेच जास्त आमदार पाहायला मिळायचे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून व्हनगुत्ती प्रकरणासह बेळगाव महापालिकेसमोर लावण्यात आलेल्या वादग्रस्त झेंड्याच्या विरोधात मराठी भाषिक आक्रमक झाले आहेत. शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या गाडीवरसुद्धा कन्नड संघटनांनी हल्ला केला होता. त्यानंतर सातत्याने या सीमाभागात वातावरण तापलेले पाहायला मिळाले आहे. त्यामुळे बेळगाव लोकसभेच्या या पोटनिवडणुकीत नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
54 टक्के मतदान
बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी एकूण 54.02 टक्के मतदान झाले आहे. यात ग्रामीण भागातील मतदान अधिक आहे. त्यामुळे या निवडणुकीचे निकाल धक्कादायक असण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. आता ही शक्यता कितपत खरी ठरते हे कळण्यासाठी सायंकाळपर्यंत वाट बघावी लागणार आहे.