ETV Bharat / city

Panchganga Pollution Issue : मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश देऊनही कंपन्यांकडून पंचगंगेचे प्रदूषण सुरुच! - Panchganga Pollution Issue

दोन दिवसांपूर्वी कसबा बावडा येथील राजाराम बंधारा येथे ( Polluted Panchganga water at Rajaram canal ) नदीमध्ये अक्षरशः पांढरा शुभ्र फेस झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पर्यावरण मंत्र्यांनी ( environment minister ) स्वतः यामध्ये लक्ष देऊन लवकरात लवकर यावर ठोस निर्णय घ्यावा. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला नदी प्रदूषणाविरोधात मोठा लढा उभा करावा लागेल, असा इशाराही ( Swabhimani Shetkari Sanghatana on Panchaganga river issue ) देण्यात आला आहे.

पंचगंगा नदी प्रदूषण
पंचगंगा नदी प्रदूषण
author img

By

Published : Dec 6, 2021, 3:25 PM IST

Updated : Dec 6, 2021, 3:40 PM IST

कोल्हापूर - कोल्हापूरची जीवनदायिनी असलेली पंचगंगा नदी ( Panchganga river pollution in Kolhapur ) गेल्या अनेक वर्षांपासून प्रदूषणाच्या विळख्यात आहे. पंचगंगा नदी प्रदूषणाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ( CM Uddhav Thackerays directions on Panchganga ) गंभीर दखल घेत प्रदूषणास जबाबदार कंपन्यांना प्रथम टाळे ठोका, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र पंचगंगा नदीचे प्रदूषण कमी झालेच नाही. उलट दिवसेंदिवस प्रदूषणात वाढच होत चालली आहे.

दोन दिवसांपूर्वी कसबा बावडा येथील राजाराम बंधारा ( Polluted Panchganga water at Rajaram canal ) येथे नदीमध्ये अक्षरशः पांढरा शुभ्र फेस झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पंचगंगा नदी प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर

प्रदूषण रोखण्यासाठी वर्षावरही झाली बैठक -

पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी बैठकीचे आयोजन केले होते. यामध्ये पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबीटकर उपस्थित होते. यावेळी प्रदूषणास जबाबदार सर्वांवर कारवाईचे आदेश देण्यात आले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर केवळ दिखाव्यासाठी कारवाई झाल्याचे चित्र आहे. नदीचे प्रदूषण कमी झाले नाही, असा स्थानिकांनी आरोप केला आहे.

प्रदूषणामुळे नदीत आलेला फेस
प्रदूषणामुळे नदीत आलेला फेस

संबंधित बातमी वाचा-पंचगंगा नदी प्रदूषणाला कारणीभूत उद्योगांना टाळे लावा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शिरोळ, हातकणंगले तालुक्याला पंचगंगा नदी प्रदूषणाचा मोठा फटका-

पंचगंगेतील साचलेली जलपर्णी
पंचगंगेतील साचलेली जलपर्णी
पंचगंगा नदीमध्ये शहरातील गटारीचे पाणीही मोठ्या प्रमाणात मिसळत असते. गटारीच्या पाण्यावर प्रक्रिया करूनच ते नदीमध्ये सोडण्याच्या सूचना आहेत. पुढे याच नदीमध्ये अनेक उद्योग व कारखान्यांचे पाणी मिसळत असते. त्यावरही प्रक्रिया करूनच सोडण्याच्या सूचना आहेत. मात्र, असे अनेकवेळा होताना पाहायला मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. या प्रदूषित पाण्याचा पुढे शिरोळ तालुक्यातील नागरिकांना व शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. शेतकऱ्यांनी अनेकवेळा प्रदूषण नियंत्रण मंडळाला कारवाई करण्याबाबत मागणी केली होती. मात्र, त्यालाही प्रतिसाद नसल्याचे नागरिकांनी म्हटले. अनेक वेळा तेरवाड बंधाऱ्यावर लाखो मृत माशांचा खच पंचगंगा नदी अनेक कारखान्यांचे दूषित पाणी व एमआयडीसीमधील प्रक्रिया झालेले पाणी थेट पंचगंगा नदीमध्ये मिसळत असते. त्यामुळे दिवसेंदिवस नदीचे पाणी दूषित होते. अनेक वेळा नदीचे पाणी अक्षरशः काळे झाल्याचे पाहायला मिळते. अनेक वेळा तेरवाड बंधाऱ्यावर हजारो मृत मासे तरंगताना पाहायला मिळतात. गेल्या काही दिवसांपूर्वी तर लाखो माशांचा खच नदीच्या काठाला पाहायला मिळाला होता. हेही वाचा-Wasim Rizvi Accept Sanatan Dharma : वसीम झाले आता जितेंद्र, रिजवींनी घेतला सनातन धर्मात प्रवेश

शिरढोण पुलाजवळ नदीमध्ये एक किलोमीटरवर जलपर्णीचा विळखा

प्रदूषित पाण्यामुळे इचलकरंजीपासून शिरोळकडे पुढे आलेल्या पंचगंगा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी व्यापली होती. मान्सूनच्या पहिल्याच पावसात वाहत आलेली जलपर्णी पंचगंगा नदीवरील शिरोळ तालुक्यातील शिरढोण पुलाला येऊन अडकली होती. जवळपास एक किलोमीटरवर ही जलपर्णी पसरली होती. त्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषणाची तीव्रता यातून दिसून येत होती. याबाबत संबंधितांनी तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा एक दिवस मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल, अशा स्थानिकांमधून प्रतिक्रिया येत आहेत.

संबंधित बातमी वाचा-तेरवाड बंधाऱ्यावर लाखो मृत माशांचा खच; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी ठेवलं बांधून

तर पंचगंगा नदी प्रदूषणाच्या विरोधात मोठ्या लढ्याची घोषणा -

पंचगंगा नदी प्रदूषणाच्या विरोधात आजपर्यंत अनेक आंदोलने झाली आहेत. अनेक पक्ष व संघटनांनी यामध्ये सहभाग नोंदविला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शिरोळ तालुक्यातील अनेकवेळा आंदोलने केली आहेत. दरम्यान, आंदोलन झाले की कारवाईचा फार्स केला जातो. अनेक कंपन्यांसोबत प्रदूषण नियंत्रण मंडळ तडजोड करत असल्याचा ( Allegation of MPCB settlement with companies ) आरोप स्वाभिमानीचे सागर शंभूषेटे यांनी केला आहे. या पंचगंगा नदी प्रदूषणामुळे या भागातील अनेक नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. भविष्यात मोठे संकट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यावरण मंत्र्यांनी स्वतः यामध्ये लक्ष देऊन लवकरात लवकर यावर ठोस निर्णय घ्यावा. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ( Swabhimani Shetkari Sanghatana on Panchaganga river issue ) नदी प्रदूषणाविरोधात मोठा लढा उभा करावा लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

२२० कोटी रुपयांचा निधी अपेक्षित

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी नदीचे प्रदूषण रोखण्यासंदर्भात विविध उपाययोजना सुचविल्या आणि सूचना केल्या होत्या. कोल्हापूर मनपा क्षेत्रातील सांडपाणी, नदी क्षेत्रातील इतर नगरपालिका आणि १७४ गावे, एमआयडीसी, इचलकरंजीतील वस्त्रोद्योग युनिट्स आदींमधून होणारे नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी साधारण २२० कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे, असे कोल्हापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले होते.

Last Updated : Dec 6, 2021, 3:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.