ETV Bharat / city

विशेष : आरबीआयच्या निर्बंधातून कोल्हापुरातील युथ बँक बाहेर; 35 'ए' मधून 'या' पद्धतीने बँकेची सुटका - युथ बँक

संपूर्ण राज्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेली कोल्हापूर जिल्ह्यातील ‘युथ डेव्हलपमेंट को - ऑप. बँक आता पुन्हा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे रिझर्व्ह बँकेने निर्बंध उठवताच अल्पावधीत सुरु होणारी महाराष्ट्रातील ही पहिली सक्षम बँक ठरली आहे. पाहुयात ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी शेखर पाटील यांचा हा विशेष रिपोर्ट..

Kolhapur Youth Bank out of RBI restrictions

author img

By

Published : Apr 9, 2021, 10:20 PM IST

कोल्हापूर - संपूर्ण राज्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेली कोल्हापूर जिल्ह्यातील ‘युथ डेव्हलपमेंट को - ऑप. बँक आता पुन्हा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे रिझर्व्ह बँकेने निर्बंध उठवताच अल्पावधीत सुरु होणारी महाराष्ट्रातील ही पहिली सक्षम बँक ठरली आहे. बँकेने लादलेल्या निर्बंधाची मुदत, ५ एप्रिल २०२१ रोजी संपत असल्याने ही बँक सुरू झाली आहे. योग्य व्यवस्थापन आणि आर्थिक नियोजन केल्यामुळे २ वर्षातच बँकेची आर्थिक गाडी रुळावर आली आहे. शिवाय योग्य पद्धतीने वसुली मोहीम राबविल्यानंतर (35 ए) सारख्या कारवाईमधून सुद्धा बँका बाहेर येऊ शकतात, हेच यातून तज्ञ संचालक चेतन नरके यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे सभासद आणि ग्राहकांमध्येही आता आनंदाचे वातावरण आहे.

आरबीआयच्या निर्बंधातून कोल्हापुरातील युथ बँक बाहेर

नरके यांचे योग्य नियोजन आणि दोन वर्षात बँक पूर्वपदावर -

या बँकेचे नेतृत्व सध्या, तज्ञ संचालक चेतन नरके करत आहेत. चेतन नरके यांनी देश-विदेशातील विविध संस्थांवर काम केले आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा त्यांना गाढा अभ्यास आहे. त्यामुळे बँकेची गाडी रुळावर आणण्यासाठी त्यांच्या या अनुभवाचा आणि प्रयत्नांचा दांडगा फायदा झाला आहे. खरंतर बँक अडचणीत आल्यानंतर ठेवीदार आक्रमक होत असतात. त्या सर्वांना विश्वासात घेणं सर्वात पहिलं काम होतं. त्या सर्वांना कशा पद्धतीने बँक पुन्हा पूर्वपदावर आणू शकतो, हे आपण माहिती दिल्यानंतर काही अपवाद वगळता ठेवीदारांनी सुद्धा कोणतीही हरकत घेतली नाही. गेल्या दोन वर्षांपासून 10 ते 12 तास बँकेसाठी वेळ देऊन बँक या संकटातून बाहेर काढण्यात यश आले आहे. दरम्यान, बँकेची सध्याची सांपत्तिक स्थिती भक्कम आहे. बँकेकडील निधी, गुंतवणूक, रोखता पाहूनच रिझर्व्ह बँकेने ही परवानगी दिली आहे. तर बँक प्रशासनाकडून, यापुढील काळात एच.डी.एफ.सी / आय.सी.आय.सी.आय या खासगी क्षेत्रातील प्रगतशील बँकांच्या धर्तीवर कामकाज करुन बँकेला भरारी देण्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे.

कर्ज दिलेल्या आणि अडचणीत सापडलेल्या व्यावसायिकांनाही मार्गदर्शन -

कर्ज वसुलीची सर्वात मोठी समस्या बँकेसमोर होती. मात्र त्यावरही योग्य नियोजनामुळे मात करणं शक्य झालं. विशेष म्हणजे जे कर्जदार व्यावसायिक अडचणीत होते त्या व्यावसायिकांना सुद्धा तज्ञ संचालक चेतन नरके यांनी मार्गदर्शन केलं. त्यांचे व्यवसाय सुद्धा पूर्वपदावर कशा पद्धतीने येऊ शकतात, याचे मार्गदर्शन केल्यानंतर संबंधित व्यवसायिकांनीही अतिशय चांगल्या पद्धतीने कर्ज परतफेड करायला सुरुवात केली आणि म्हणूनच बँकेवरील निर्बंध उठण्यामध्ये मोलाची मदत झाली असल्याचेही चेतन नरके यांनी म्हटले. याबद्दल रिझर्व्ह बँकेनेही त्यांचे कौतुक केले असून अडचणीत आलेल्या संस्था, सोसायटी, व्यवसायिकांनाही आपण मार्गदर्शन करत राहा, असे त्यांनी म्हटले आहे.

बँकेची सांपत्तिक स्थिती पुढीलप्रमाणे -

१) भागभांडवल - ६.५२ कोटी
२) निधी - १७. ९२ कोटी
३) ठेवी - ७४.२१ कोटी
४) कर्जे - १३.०४ कोटी
५) गुंतवणूक – ६९.०० कोटी
६) नफा – ७.०० कोटी
७) सीआरएआरचे प्रमाण ( आवश्यक प्रमाण किमान ९ टक्के ) १५ टक्केच्या वर
८) नेटवर्थ (उणे नसावे ) ३ कोटीचे वर आहे

बँक निर्बंधातून बाहेर काढण्यासाठी राबविलेल्या योजना -

1)भाग भांडवलात रुपये २ कोटी वाढ
2)कायदेशीर बाबींची पुर्तता करुन तारण मालमत्तेची थेट विक्री
3)ठेव विमा हप्ता नियमित भरणा
4)उत्पन्न वाढीकडे दैनंदिन लक्ष
5)व्यवस्थापन खर्चात कपात
6)संचालक मंडळ सभा भत्ता पूर्ण बंद
7)वसुली व दैनंदिन कामकाजावर पूर्ण लक्ष

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.