ETV Bharat / city

Kolhapur Municipal Corporation Budget 2022 : कोल्हापूर महानगरपालिकेचा ९८८.३१ कोटींचा अर्थसंकल्प सादर, 1 रुपयांचीही कर वाढ नाही - कोल्हापूर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर

कोल्हापूर महानगरपालिकेचा २०२१-२०२२ चा सुधारित तसेच २०२२-२०२३ चे नवीन अंदाज अर्थसंकल्प आज (सोमवार) ( Kolhapur Municipal Corporation Budget 2022 ) सादर करण्यात आला. महापालिकेचे आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. सर्व अर्थ संकल्पात एक रुपयाचीही कर वाढ न केलेली नाही आहे.

Kolhapur Municipal Corporation Budget 2022
कोल्हापूर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर
author img

By

Published : Mar 7, 2022, 7:15 PM IST

कोल्हापूर - कोल्हापूर महानगरपालिकेचा २०२१-२०२२ चा सुधारित तसेच २०२२-२०२३ चे नवीन अंदाज अर्थसंकल्प आज (सोमवार) ( Kolhapur Municipal Corporation Budget 2022 ) सादर करण्यात आला. महापालिकेचे आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. थेट पाईप लाईन योजना , पर्यटनस्थळे, महिला स्वच्छतागृह, आयटी पार्क, आरोग्य सुविधा, पर्यावरण संवर्धन, पाणी पुरवठा वितरण योजना यासह अन्य विकास कामांसाठी 988.31 कोटीचा अंदाजीय अर्थसंकल्प असल्याचे आयुक्त बलकवडे यांनी सांगितले. हा सर्व अर्थ संकल्प हा एक रुपयाचा सुद्धा कर वाढ न करता जाहीर करण्यात आला आहे.

कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे

एकूण ९८८.३१ कोटीचा अर्थसंकल्प -

कोल्हापूर महानगरपालिकेत आज २०२२-२३ चे अर्थसंकल्पीय बजेट सादर करण्यात आले. सध्या कोल्हापूर महानगरपालिकेत सध्या प्रशासक राजवट सुरु असून सलग दुसऱ्या वर्षी प्रशासक आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी महापालिकेचे नवीन वर्षाचे अंदाजपत्रक उपसमितीसमोर सादर केले. यंदाचा अर्थसंकल्प कोल्हापूरकरांसाठी दिलासादायक ठरला आहे. कोणतीही कर वाढ न करता अर्थसंकलप सादर करण्यात आला आहे. तसेच काही नावीन्य पूर्ण योजनाचा देखील समावेश करण्यात आला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेचे सन 2022-23 चे अर्थसंकल्पीय अंदाजात अव्वल शिल्लकेसह महसूली व भांडवली अपेक्षित जमा रक्कम रुपये 673.70 कोटी असून खर्च रुपये 672.71 कोटी अपेक्षित आहे. तसेच विशेष प्रकल्पा अंतर्गत सुरु असले कामांचे जमा खर्चाचे स्वतंत्र अंदाज सोबत सादर केले असून त्यामध्ये जमा रुपये 245.49 कोटी अपेक्षित असून खर्च रुपये 241.30 कोटी अपेक्षित आहे. महिला व बालकल्याण निधी व केंद्रीय वित्त आयोगाचे एकत्रित स्वतंत्र पत्रक अंदाजपत्रकामध्ये दर्शविण्यात आले आहे. वित्त आयोगाअंतर्गत एकूण जमा रु. 69.12 कोटी अपेक्षित असून खर्च रु. 68.92 कोटी अपेक्षित आहे.एकूण महसुली, भांडवली व वित्त आयोग मिळून एकूण ९८८ कोटी ३१ लाखाचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले.

सर्वांगीण विकासासाठी योजना -

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या या अर्थसंकलपात सुरळीत पाणी पुरवठा, पर्यावरण पूरक प्रकल्प विकसित करणे, इलेक्ट्रिक वाहनाना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच चार्जिंग स्टेशन सुरू करणाऱ्याला मालमत्ता करात सूट देणे, आरोग्य व स्वच्छता अनुषंगिक प्रकल्प, फिरते दवाखाने सुविधा देणे, महिलांसाठी खास फिरते शौचालय, हेरीटेज वास्तू संवर्धन यासह अनेक बाबींवर आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. कोल्हापूर शहराचे सर्वांगिण विकास व रोजगार निर्मितीसाठी आय.टी.पार्क असणे आवश्यक आहे. यासाठी मनपाच्या टेंबालाईवाडी येथील आरक्षीत जागेवर पीपीपी माध्यमातून आयटी पार्क विकसित करणेबाबत प्रस्तावीत आहे. यासाठी आवश्यक फिजीबीलीटी रिपोर्ट व अनुषंगिक काम पूर्ण करणेत आले आहे. याकामी निविदा प्रक्रीया राबवून आयटी पार्क विकसीत करणेबाबत प्रस्तावीत आहे. याकामी अनुषंगिक कामासाठी अंदाजपत्रकामध्ये तरतूद करण्यात आली आहे.

केएमटीसाठी ६४.६७ कोटीची तरतूद -

सन 2022-2023 चे नवीन अंदाजपत्रकामध्ये के.एम.टी. बस ताफ्यातील 129 बसेसपैकी 85 बसेस दैनंदिन मार्गस्थ करणेचे नियोजन असून सदर बसेस पासून प्रवासी तिकीट विक्रीतून मिळालेले उत्पन्न व पे ण्ड पार्किंग, बसवरील जाहिरात इत्यादी मार्गाने येणारे उत्पन्न महसूली जमेस धरणेत आले आहे. यामध्ये नवीन आर्थिक वर्षामध्ये बसेसमध्ये जुन्या डिझेल इंजिनच्या बसेस इलेक्ट्रिक बसेसमध्ये रुपांतरीत करणे साठी प्रायोगिक तत्वावर दोन बसेसचा प्रकल्प प्रति कि.मी. दराप्रमाणे राबविणे, परिवहन उपक्रमाकडील सर्व चालक कर्मचाऱ्यांना पीसीआरए व आयटीआय, कोल्हापूर यांचेमार्फत प्रशिक्षण देणे. यातून प्रति लिटर धांवेमध्ये वाढ होऊन डिझेल खर्चात बचत करणे. यंत्रशाळेकडील कर्मचाऱ्यांना बसेसच्या उत्पादित कंपन्यांमार्फत प्रशिक्षण देणे, प्रवासी नागरिकांना डिजीटल सुविधा पुरविणेसाठी मोबाईल प विकसीत करणे - यामध्ये बसेसचे रुट, वेळापत्रक, बस स्टॉप्स, तिकीट व पासेसचे दर इ.माहिती SMS द्वारे देणे, MIDC येथील जागा विकसीत करणे, महानगरपालिकेच्या महिला बाल कल्याण विभागाकडून दोन बसेस महिला व विद्यार्थ्यांसाठी खरेदी करणे, ITMS अंतर्गत ई-तिकीटींग व पास वितरण यंत्रणा अद्ययावत करणे, त्याचबरोबर 2017 पासून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युईटी व इतर थकीत देणी देण्यासाठी इ. महत्वपूर्ण बाबींसाठी आवश्यक तरतूद करण्यात आली आहे.

प्राथमिक शिक्षण समितीसाठी एकूण 67.87 कोटी ची तरतूद -

कोल्हापूर शहरामध्ये एकूण 58 म.न.पा प्राथमिक शाळा सुरु असून 17 शाळांमधून सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरु आहेत. मनपा शाळांसाठी कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूरच्या मालकीच्या 58 शालेय इमारती उपलब्ध करुन देणेत आलेल्या असून सध्या मनपा प्राथमिक शाळांमध्ये 10713 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्राथमिक शिक्षण समिती, महानगरपालिका, कोल्हापूरकरिता सन 2022 - 2023 साठी शासनाकडे प्रस्तावित तरतूद 23,70,38,734/- व म.न.पा.कडे प्रस्तावित तरतूद 42,00,00,000/- चे एकत्रित नवीन अंदाजपत्रक अव्वल शिलकेसह (अव्वल शिल्लक रु. 2,17,24,591/-) रक्कम रुपये 67,87,63,325/- चे सादर करण्यात आली आहे.यामध्ये विद्यार्थांनसाठी 2022 मध्ये नवीन तीन सेमी इंग्रजी मनपा प्राथमिक शाळा सुरु करणेचा मानस आहे. तसेच विद्यार्थांसाठी ई लर्निग सुविधा पुरवण्यात येणार आहेत. तसेच संगणक देखील देण्यात येणार आहेत. या शिवाय विशेष बाब म्हणजे पहिल्यांदाच मनपा च्या काही विद्यार्थ्यांना इस्त्रोची विमानाद्वारे सफर घडवण्यात येणार आहे.

हेही वाचा - Sanjay Raut PC : संजय राऊतांच्या टार्गेटवर आता कोण? उद्या होणार खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.