कोल्हापूर : पूरस्थितीचा सामना करणाऱ्या कोल्हापुरातील चिखली आणि आंबेवाडी या गावातून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम सध्या बचाव पथकाकडून केले जात आहे. पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडल्याने बचावकार्य वेगाने राबविले जात आहे.
नदीने इशारा पातळी ओलांडल्यानंतर नागरिकांना सुरक्षीतस्थळी जाण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या होत्या. प्रशासनाच्या सूचना ऐकून अनेकांनी स्वतःहून स्थलांतर केले मात्र अजूनही काही नागरिक गावात अडकल्याने त्यांना रेस्क्यू करण्याचे काम सुरू आहे. याच संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी.
![Kolhapur Floods : आंबेवाडी, चिखलीतील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-kop-04-ambewadi-chikhali-rescue-story-2021-wkt-7204450_23072021130026_2307f_1627025426_39.jpg)
या गावातील नागरिकांना बचाव पथकाकडून सुरक्षित ठिकाणी हलविले जात आहे.
![Kolhapur Floods : आंबेवाडी, चिखलीतील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-kop-04-ambewadi-chikhali-rescue-story-2021-wkt-7204450_23072021130026_2307f_1627025426_225.jpg)
हेही वाचा - Kolhapur Drone Video: पाहा कोल्हा'पूर', पंचगंगेचे रौद्ररूप, अंगावर उभा राहिल काटा