कोल्हापूर : कोल्हापुरात एका मोबाईल दुकानात मोठ्या चोरीची घटना समोर ( Major Theft Incident In Kolhapur ) आली आहे. यामध्ये चोरट्यांनी जवळपास 70 ते 80 आयफोन चोरी ( Major Theft Incident In Kolhapur ) केल्याची माहिती मिळत असून, याबाबत शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. येथील बसस्थानक परिसरात असलेल्या जेमस्टोन इमारतीमधील आय प्लॅनेट या मोबाईलच्या दुकानात ही मोठी चोरी झालीये. पोलीस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, यापूर्वीसुद्धा याच दुकानात चोरी झाली होती, अशी माहिती मालकाने दिली आहे.
यापूर्वीसुद्धा आयफोन चोरीस : दरम्यान, याच आय प्लॅनेट मोबाईल दुकानात यापूर्वी चोरी झाली होती. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून त्यातील अनेक मोबाईल लंपास केले होते. लाखो रुपयांचे हे आयफोन होते, अशीही माहिती आहे. त्यावेळी चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. आतासुद्धा याच दुकानाच्या पाठीमागे असणाऱ्या खिडकीतून प्रवेश करीत 70 ते 80 सेकंड हॅन्ड आयफोनची चोरी केली आहे. लाखो रुपये किमतीचे हे मोबाईल होते. दरम्यान, यावेळी चोरट्यांनी मोबाईल तर लंपास केलेच शिवाय दुकानातील सीसीटीव्हीचे सर्किट डिव्हीआर, महत्त्वाचे बिलबुक तसेच इतर साहित्यसुद्धा लंपास केल्याची माहिती मिळत आहे.