ETV Bharat / city

Kolhapur Cat Show : कोल्हापूरातल्या 'कॅट शो' मधील मांजरांच्या किंमती ऐकून व्हाल थक्क

'फेलाईन क्लब ऑफ इंडियाच्या' कोल्हापूर शाखेच्या माध्यमातून मार्केट यार्ड येथे कॅट शोचे ( Kolhapur Cat Show ) आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये देशी-विदेशी मांजरांच्या प्रजातींनी सहभाग नोंदवला आहे.

author img

By

Published : Mar 27, 2022, 7:47 PM IST

Kolhapur Cat Show
Kolhapur Cat Show

कोल्हापूर - देश-विदेशातील विविध प्रजातींची एकापेक्षा एक मांजरे पाहण्याची संधी कोल्हापूरकरांना मिळाली आहे. येथील मार्केट यार्ड परिसरातील महाराजा हॉल येथे 'फेलाईन क्लब ऑफ इंडियाच्या' कोल्हापूर शाखेने 'कॅट शो'चे ( Kolhapur Cat Show ) आयोजन केले आहे. त्यामध्ये कोल्हापूरसह विविध ठिकाणांहून अनेकजण आपली मांजरे घेऊन या शो मध्ये सहभागी झाले होते. विशेष म्हणजे यामध्ये जगातील सर्वात मोठे मांजर तसेच लाखो रुपये किंमतीची मांजरे सुद्धा पाहण्याची संधी कोल्हापूरकरांना मिळाली आहे.

बंगाली कॅट ठरले आकर्षण - या कॅट शो मध्ये विविध प्रजातींची मांजरे सहभागी झाली होती. मात्र, बिबट्यासारखे दिसणाऱ्या 'बंगाली कॅट'ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अगदी हुबेहूब बिबट्या सारखे दिसणारे हे मांजर दोन रंगाचे आहे. याची किंमत सुद्धा चक्रावून टाकणारी आहे. एका मांजराची किंमत जवळपास दीड ते दोन लाखांपासून सुरू होते. त्यामुळे अतिशय महागड्या मांजाऱ्यांच्या प्रजातींपैकी ही एक प्रजाती असल्याचे सदस्यांनी सांगितले.

फेलाईन क्लब ऑफ इंडियाच्या सदस्य संवाद साधताना
जगातील सर्वात मोठी मांजराची प्रजाती - जगातील सर्वात मोठ्या मांजराच्या प्रजातीतील अनेक मांजरे पाहण्याचा अनेकांना योग आला. या मांजरांची सुद्धा प्रचंड निगा राखावी लागते. शिवाय या मांजराचे वजन 15 ते 16 किलोपर्यंत असते. या मांजराची किंमत सुद्धा दीड ते दोन लाखांपासून सुरू होते. या कॅट शो मुंबई, पुणे, बेंगलोर, गोवा, आदीसह इतर जिल्ह्यातील देश विदेशी प्रजातींची 3 लाखांपर्यंत किंमत असलेली मांजरे सुद्धा शो मध्ये दाखल झाली आहेत. दरम्यान, कोल्हापूर मध्ये दुसऱ्यांदा या कॅट शो आयोजन करण्यात आले आहे.
कॅट शोमध्ये सहभागी झालेली मांजरे
कॅट शोमध्ये सहभागी झालेली मांजरे
एकूण 200 हुन अधिक स्पर्धक - कॅट शो मध्ये एकूण 200 हून अधिक स्पर्धक आपली महागडी, देखणी मांजरे घेऊन सहभागी झाले होते. तब्बल 15 प्रजातींची मांजरे पाहायला मिळाली. यावेळी स्पर्धेच्या ठरलेल्या निकषानुसार सर्वात सुंदर आणि आकर्षक मांजराचे नंबर काढण्यात आले. त्यांना 'फेलाईन क्लब ऑफ इंडियाच्या' कोल्हापूर शाखेकडून गौरविण्यात आले.
कॅट शोमध्ये सहभागी झालेली मांजरे
कॅट शोमध्ये सहभागी झालेली मांजरे

हेही वाचा - Suspicious Transactions : यशवंत जाधवांनी 'मातोश्री'ला दिले 2 कोटी 60 लाख? आयकरने जप्त केलेल्या डायरीत उल्लेख

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.