ETV Bharat / city

'मंदिर बंद, उघडले बार... उद्धवा धुंद तुझे सरकार', भाजपाचे कोल्हापुरात उपोषण

हिंदू धर्मामध्ये अध्यात्माला अत्यंत महत्त्व आहे. कोणताही भाविक मंदिरामध्ये गेल्यानंतर त्याचा मानसिक ताण कमी होतो. असा दावा करत भारतीय जनता पार्टीने सातत्याने मंदिर उघडण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारने बार आणि रेस्टॉरंट उघडायला परवानगी दिली. मात्र मंदिरांना नाही, असा दावाही करण्यात येतोय.

BJP protest for temples

author img

By

Published : Oct 13, 2020, 5:44 PM IST

कोल्हापूर - भारतीय जनता पार्टीच्यावतीने संपूर्ण राज्यभरात मंदिर उघडण्याची मागणी जोर धरत आहे. याच पार्श्वभूमीवर मिरजकर तिकटी येथे भाजपच्या वतीने उपोषण करण्यात आले. सकाळी दहा वाजल्यापासून भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या उपोषणात सहभागी झाले होते. यावेळी 'मंदिर बंद उघडले बार... उद्धवा धुंद तुझे सरकार', असे म्हणत कार्यकर्त्यांनी भजन केले. तसेच तात्काळ मंदिर सुरू करा, अन्यथा भाविकांसह रस्त्यावर उतरू, असा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला आहे.

'मंदिर बंद, उघडले बार... उद्धवा धुंद तुझे सरकार', भाजपाचे कोल्हापुरात उपोषण
हिंदू धर्मामध्ये अध्यात्माला अत्यंत महत्त्व आहे. कोणताही भाविक मंदिरामध्ये गेल्यानंतर त्याचा मानसिक ताण कमी होतो. असा दावा करत भारतीय जनता पार्टीने सातत्याने मंदिर उघडण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारने बार आणि रेस्टॉरंट उघडायला परवानगी दिली. मात्र मंदिरांना नाही, असा दावाही करण्यात येतोय.
BJP protest for temples
राज्य सरकारने बार आणि रेस्टॉरंट उघडायला परवानगी दिली. मात्र मंदिरांना नाही, असा दावाही करण्यात येतोय.

हे सरकारच असंवेदनशील असल्यामुळे हा दिवस आला असून सरकारने भक्तांचा अंत पाहू नये, असा इशारा भाजपाच्या वतीने देण्यात आलाय. त्यामुळे आता तरी मंदिरे उघडा अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.

बार-रेस्टॉरंटमध्ये गेलेला माणूस मास्क काढून त्या ठिकाणी वावरतो. परंतु मंदिरामध्ये गेलेला माणूस हा मास्क काढणारच नाही. त्यामुळे मंदिरं यापूर्वीच सुरू व्हायला हवी होती, असा आग्रह भाजपाचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी केला आहे. पण ज्यांनी आजपर्यंत हिंदुत्व जगले, अध्यात्म मांडले ते आता कुठेतरी काँग्रेसमय झाल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावलाय.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.