ETV Bharat / city

Jayprabha Studio Issue : '26 हजार रुपये घ्या, अन् जयप्रभा स्टुडिओ सोडा'; शिवसेनेचे राजेश क्षीरसागरांना आव्हान - shivsena agitation against rajesh kshirsagar

काही दिवसांपूर्वी जयप्रभा स्टुडिओची विक्री ( Jayprabha Studio Issue ) झाल्याची बातमी समोर आली होती. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आज ( 21 जुलै ) राजेश क्षीरसागरांविरोधात आंदोलन केलं ( Shivsena Agitation Against Rajesh Kshirsagar ) आहे.

rajesh kshirsagar
rajesh kshirsagar
author img

By

Published : Jul 21, 2022, 7:13 PM IST

कोल्हापूर - कोल्हापूरची अस्मिता आणि भालजी पेंढारकर यांच्या कार्याची एकमेव आठवण असलेल्या जयप्रभा स्टुडिओची विक्री झाल्याची बातमी समोर येताच कोल्हापूरात पुन्हा एकदा आंदोलनाची ठिणगी पडली. गेल्या अनेक वर्षांपासून हा स्टुडिओ वाचावा यासाठी कोल्हापूरकरांनी लढा दिला. मात्र, त्याची विक्री झाल्याचे समजताच पुन्हा एकदा आंदोलन सुरू झाले आहे.

जयप्रभा स्टुडिओसमोर चित्रपट महामंडळाकडून 160 दिवस झालं बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. यालाच पाठिंबा देत आज ( 21 जुलै ) शिवसैनिक सुद्धा रस्त्यावर उतरले आहेत. या स्टुडिओची ज्यांनी खरेदी केली, त्या माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी जितकी गुंतवणूक केली आहे. ते पैसे चेकद्वारे पाठवले असून तात्काळ स्टुडिओ सोडा, अशी मागणी शिवसैनिकांनी केली ( Shivsena Agitation Against Rajesh Kshirsagar ) आहे.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना प्रतिनिधी

'धर्मवीर पेक्षा कर्मवीर व्हा' - यावेळी शिवसेनेच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वतः चित्रपट महामंडळाचे पदाधिकारी धनाजी यमकर याठिकाणी आले. त्यांनी यावेळी क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधला आहे. आपण धर्मवीर होऊ नका, पहिला कर्मवीर व्हा. कोल्हापूरकरांची या कला नगरीची ओळख असलेली जागा आम्हाला परत करा, असे आव्हान त्यांनी क्षीरसागार यांना केलं आहे.

Shivsena Agitation Against Rajesh Kshirsagar
शिवसेनेने राजेश क्षीरसागरांना पाठवलेला चेक

काय आहे जयप्रभा स्टुडिओचा वाद ? - लता मंगेशकर यांच्या मालकीची असलेला जयप्रभा स्टुडिओ आणि येथील जागा 15 फेब्रुवारी 2020 मध्येच तुकडे पाडत अनेकांना विकल्याचे समोर आले. 6 कोटी 50 लाखांना हा व्यवहार झाला. मात्र, ज्या कोल्हापूरकरांनी लता मंगेशकर यांच्याविरोधात जाऊन जागा विक्री विरोधात लढा दिला होता. त्याच कोल्हापूरकरांच्या डोळ्यात धूळ फेकत ही जागा दोन वर्षांपूर्वीच विक्री झाल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे कोल्हापूरातील व्यक्तींनीच आणि विशेष म्हणजे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मुलांनी ही जागा खरेदी केल्याची माहिती समोर येताच कोल्हापुरकर संतापले असून पुन्हा एकदा तीव्र लढा सुरू झाला आहे. 160 हुन अधिक दिवस चित्रपट महामंडळाचे पदाधिकारी आणि कलाकार याठिकाणी ठिय्या आंदोलनाला बसले आहेत. मात्र, याबाबत अध्याप काहीही निर्णय झाला नाहीये. क्षीरसागर हे स्वतः ही जागा द्यायला तयार आहे, असे सांगत असून त्या बदल्यात आपल्याला दुसरीकडे जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ते करत आहेत. पण, हाच धागा पकडत क्षीरसागर यांच्या विरोधात आज शिवसेनेने आंदोलन केले असून, ही जागा खरेदी करताना त्यांनी जेवढे पैसे गुंतवले जे स्वतः क्षीरसागर मुलाखतीत सांगतात तेच त्यांना चेक द्वारे परत करत असल्याचे शिवसेनेचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी म्हटलं आहे. त्यामुळे क्षीरसागरांनी ही जागा कोल्हापूरकरांना परत करावी, असेही इंगवलेंनी सांगितलं.

हेही वाचा - Aaditya Thackeray : शिंदेंच्या गडात आदित्य ठाकरेंची गर्जना, 'शिवसेना सोडून गेलेले गद्दारच, बंड करण्यासाठी...'

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.