कोल्हापूर : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील ( Ichalkaranji Assembly constituency ) अपक्ष आमदार प्रकाश आवाडे ( MLA Prakash Awade ) यांनी भाजपला पाठिंबा ( Awade Support to BJP ) दिला आहे. स्वतः त्यांनी याबाबत जाहीर माहिती दिली. शिवाय राज्यसभेसारखे विधान परिषदेवर ( Legislative Council Elections ) आमदार येणार निवडून येतील, असा विश्वाससुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे. एवढेच नाही तर त्यांनी यापुढे प्रत्येक निवडणुकीत राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणातसुद्धा केवळ भाजपच दिसेल, असा विश्वास व्यक्त करीत ( Claim Victory ) आपण आता सर्वच निवडणुकांमध्ये भाजपला पाठिंबा द्यायचे ठरवले असल्याचेसुद्धा त्यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीने संपर्क केला तरीही माझं मत भाजपला : दरम्यान, यावेळी बोलताना आवाडे म्हणाले, राज्यसभेच्या निवडणुकीत कोणालाही अंदाज नव्हता, पण त्यामध्ये भाजपचा विजय झाला. धनंजय महाडिक हे राज्यसभेवर निवडून गेले. राज्यसभेलासुद्धा आपण भूमिका स्पष्ट केली होती. त्याप्रमाणेच यावेळी माझी भूमिका असणार आहे. जरी महाविकास आघाडीकडून मला विचारणा झाली, तरी मी भाजपलाच पाठिंबा देण्यावर ठाम आहे.
भाजपवर विश्वास : माझा भाजपवर पूर्ण विश्वास (Full Faith in BJP) आहे. त्यामुळे इथून पुढे संपूर्ण राजकारण भाजपबरोबर करणार असल्याचेसुद्धा त्यांनी स्पष्ट केले. आपण स्वतः आणि जनस्वराज्य पक्षाचे विनय कोरे आम्ही दोघांनीसुद्धा आता जिल्ह्याच्या राजकारणात भाजपसोबतच जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे यापुढे केवळ भाजपच दिसेल असेही ते म्हणाले.
हेही वाचा : Vidhan Parishad Elections : 'राज्यसभेची परिस्थिती वेगळी, विधान परिषद निवडणुकीत मविआचे सहा उमेदवार जिंकणार'