ETV Bharat / city

क्रूरकर्मा बापाची निष्ठुरता कोवळ्या मुलांच्या जीवावर.. दीड महिन्यात 'या' पाच घटनांनी हादरले कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा शेती, उद्योग व व्यापारात सदन जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात घडलेल्या हत्येच्या पाच घटनांनी जिल्ह्याचे समाजमन सुन्न झाले आहे. पाच पैकी चार घटनेत आपल्या पित्यानेच मुलाचा जीव घेतल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. एकामागून एक घटना घडत गेल्याने कोल्हापूर जिल्हा हादरून गेला आहे. धक्कादायक म्हणजे पाच पैकी चार घटनेत मुलाचा बळी घेणारा आरोपी हा बापच आहे.

kolhapur murder
kolhapur murder
author img

By

Published : Oct 8, 2021, 7:17 PM IST

कोल्हापूर - जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात घडलेल्या विदारक पाच पैकी चार घटनेत आपल्या पित्यानेच मुलाचा जीव घेतल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. एकामागून एक घटना घडत गेल्याने कोल्हापूर जिल्हा हादरून गेला आहे. धक्कादायक म्हणजे पाच पैकी चार घटनेत मुलाचा बळी घेणारा आरोपी हा बापच आहे. तर एका प्रकरणात बापाच्या मित्रानेच मुलाची हत्या केली आहे. एकूणच जवळचा व्यक्ती किंवा नातेवाईक यांच्यामधीलच व्यक्ती क्रूरकर्मा बनून एका निष्पापाचा बळी घेत असल्याचे चित्र आहे. एकूणच बालक ते पालक यांच्या नात्यातील हिंसक घटना समाजमनाला सुन्न करणाऱ्या आहेत. पाहुयात ईटीव्ही भारतचा हा स्पेशल रिपोर्ट..

कोल्हापूर जिल्हा शेती, उद्योग व व्यापारात सदन जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात विदारक आणि समाजमन विस्कळीत करणाऱ्या घटना घडल्या आहेत. गेल्या दीड महिन्याच्या काळात पाच निष्पाप आणि कोवळ्या जीवांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दीड महिन्याच्या काळात निरागस आणि कोवळ्या मुलांचे अपहरण करून खून केला जात असल्याच्या घटनेत वाढ झाली आहे. गेल्या दीड महिन्यात तब्बल पाच मुलांचा खून करण्यात आला आहे. तोही नात्यातील जवळच्याच व्यक्तीने केल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. पाच पैकी चार प्रकरणात या निष्पाप मुलांचा जीव घेणारा दुसरा तिसरा कोणी नसून त्या कोवळ्या जीवांचा बाप आहे, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. तर एका प्रकरणात बापाच्या मित्रानेच निरागस मुलाची हत्या केल्याचे समोर आले आहे.

दीड महिन्यात 'या' पाच घटनांनी हादरले कोल्हापूर

जिल्ह्यातील 'या' पाच घटना -

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात पाच निष्पाप बालकांचा जीव घोटला गेला. यात चार बालकांसह एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. पाच पैकी चार खून हे नात्यातीलच किंवा जवळच्या व्यक्तीकडून केले असल्याने पोलिसांना देखील धक्का बसला आहे

  1. कागल तालुक्यातील सोनाळीतील वरद पाटील याचे अपहरण करून खून केल्याची घटना महिनाभरापूर्वी घडली होती. पोलीस तपासात वरदची हत्या बापाच्या मित्रानेच केली असल्याचे समोर आले. या प्रकरणात अनैतिक संबंधातून हे कृत्य झाल्याचा पोलिसांना संशय आहे.
  2. शिरोळ तालुक्यातील 17 वर्षीय साक्षी दशरथ काटकर या तरुणीला वडिलांनीच नदीत ढकलून तिची हत्या केली. साक्षीचे प्रेम प्रकरण कळाल्यानंतर वडिलांनी हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात पुढे आले.

  3. हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजीमध्ये औषधोपचाराचा खर्च परवडत नाही म्हणून वडिलांनीच अफान मुल्ला या बालकाला नदीत फेकून देऊन त्याची हत्या केली.
  4. कागल तालुक्यातील यळगुड येथे प्रणाली साळुंखे या मुलीची हत्या तिच्याच सावत्र बापाने केल्याची घटना समोर आली.
  5. चार दिवसांपूर्वी शाहूवाडीतील वारणा कापशी येथे आरव केसरे या मुलाचे अपहरण करून खून केल्याची घटना घडली होती. या हत्येमागे आरवचे वडीलच असल्याचे पोलीस तपासात समोर आले. अनैतिक संबंधातून खून झाले असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.

    हे ही वाचा -Honey Trap Victim : हनी ट्रॅपमध्ये का अडकतो तरुण? सोशल मीडिया वापरताना काय घ्यावी काळजी, वाचा स्पेशल रिपोर्ट

नरबळीचा बनाव आणि तपास यंत्रणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न -

कागल तालुक्यातील सोनाळी येथे झालेली वरदची हत्या संशयित आरोपीने नरबळीतून झाली असल्याचा बनाव केला होता. मात्र पोलिसांनी तपास करत ही हत्या नरबळी नसल्याचे सिद्ध केले होतं. तसाच प्रकार शाहूवाडीतील वारणा कापशी येथे झालेल्या आरव केसरे याच्या हत्ये दरम्यान घडला होता. आरवच्या मृतदेहावर हळद-कुंकू टाकून ही हत्या नरबळीतून झाल्याचा बनाव संशयित आरोपीने केला होता. मात्र पोलिसांनी या दोन्ही हत्या नरबळीतून झाली नसल्याचे सांगितले आहे. केवळ तपास यंत्रणेची दिशाभूल करण्यासाठी हा प्रयत्न केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अनैतिक संबंधातून निष्पाप बालकांचा घेतला जीव -

कागल तालुक्यातील सोनाळीमधील वरद पाटीलची हत्या अनैतिक संबंधातून झाली आहे. असा संशय पोलिसांना आहे. याबाबत ठोस कागदपत्रे घेऊन आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे. तर शाहूवाडी तालुक्यातील वारणा कापशी येथे झालेली आरव केसरेची हत्या अनैतिक संबंधातून झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र याच अनैतिक संबंधपायी निष्पाप बालकांचा जीव जातोय, याचं समाजभान मात्र क्रूरकर्मा या बापांना का येत नाही? असा सवाल उपस्थित होतोय.

टोकाचे दारिद्र्य, बेरोजगारी, व्यसनाधीनता आणि अशैक्षणिकपणा ही देखील कारणे -

जिल्ह्यातील पाच पैकी चार घटनांमध्ये बालकांची हत्या करणारा व्यक्ती हा बापच असल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. मात्र या संपूर्ण घटनेमागे टोकाचे दारिद्र्य, बेरोजगारी, व्यक्तीची व्यसनाधीनता, अशैक्षणिकपणा आणि आपण सापडले जाण्याची भीती हीच आहे. असं मत मनोविकार तज्ञ पीएम चौगुले यांनी व्यक्त केले आहे.

क्राईम चेन घडण्याची भीती -

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दीड महिन्याच्या काळात वारंवार त्याच-त्याच घटना घडल्याचे समोर आले आहे. जेव्हा एखादी घटना घडते त्यावेळी अशाच प्रसंगात अडकलेल्या अनेकांना हाच मार्ग स्वीकारावा, असे वाटू लागते. त्यामुळे जिल्ह्यात अशाच प्रकारे क्राईम चेन घडण्याची भीती निर्माण होते, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.