ETV Bharat / city

ईटीव्ही भारत इम्पॅक्ट: विना मास्क फिरणाऱ्यांना आज गांधीगिरीचा डोस, उद्यापासून कडक कारवाई

author img

By

Published : Nov 7, 2020, 3:30 PM IST

Updated : Nov 7, 2020, 4:30 PM IST

कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव घटला आहे. मात्र, आता दिवाळीच्या तोंडावर बाजारपेठेत गर्दी वाढली असून हात गाडीवाले, फेरीवाले यांच्याकडून कोरोना प्रतिबंधात्मक उयाययोजनांच्या नियमावलींची पायमल्ली केली जात होती. यांच्यावर प्रशासनाकडून आता कारवाईला गांधीगिरी पद्धतीने सुरुवात झाली आहे.

विना मास्क फिरणाऱ्यांना आज गांधीगिरीचा डोस

कोल्हापूर- कारवाई होते मग भीती का नाही? या मथळ्याखाली दोन दिवसापूर्वीच ईटीव्ही भारतने बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेत अखेर महापालिका अधिकाऱ्यांना आता उपरती सुचली आहे. आज थेट रस्त्यावर उतरत विना मास्क व्यवसाय करणारे फेरीवाले, नागरिक यांच्याविरोधात गांधीगिरी पद्धतीने गुलाब पुष्प आणि मास्क देऊन त्यांनी आवाहनात्मक कारवाईला सुरुवात केली. थेट अतिरिक्त आयुक्त रस्त्यावर उतरल्याने महाद्वार रोडवरील फेरीवाल्यांचेंही यावेळी धाबे दणाणले होते.

कोल्हापूर चेंबर्स असोसिएशनचा पुढाकार-

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील प्रमुख बाजारपेठ असणाऱ्या राजारामपुरी, महाद्वार रोड, लक्ष्मीपुरी परिसरात गर्दी असते. सार्वजनिक ठिकाणी सामाजिक आंतर, फेस मास्क, सॅनिटायझर, बंधनकारक असताना काही फेरीवाले या नियमाला हरताळ फसत होते. त्याबाबत दोन दिवसापूर्वी ईटीव्ही भारतने 'कारवाई होते मग भीती का नाही?' या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. याची दखल घेत आज कोल्हापूर चेंबर्स असोसिएशन यांच्या पुढाकाराने महापालिकेचे अधिकारी थेट रस्त्यावर उतरले.

गुलाब पुष्प आणि मास्क, उद्या दंड

विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांच्या विरोधात गांधीगिरी पद्धतीने आंदोलन सुरू केलं. शहरात फिरणाऱ्या विना मास्कवाल्यांना अडवून त्यांना गुलाब पुष्प आणि मास्क देऊन यांचे स्वागत केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त यांच्याशी ई टीव्ही भारतने संवाद साधला. त्यावेळी महापालिकेचे नूतन आयुक्त बलकवडे यांच्या आदेशानुसार आज विना मास्क फिरणाऱ्या फेरीवाले आणि व्यवसाय करणाऱ्या विरोधात गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले जाईल. तसेच उद्यापासून कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराच अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी दिला

हे गांधीगिरी आंदोलन सुरू असताना अनेक फेरीवाले अधिकारी यांच्याकडून मास्क घेतले. त्याच्यासमोर तोंडावर घातले मात्र ते पुढे जाताच पुन्हा खिशात घालून आपला व्यवसाय सुरू ठेवला. यावरूनच अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांचे किती भीती हे फेरीवाले बाळगतात हेच दिसून येते.

हेही वाचा - कारवाई होते मग भीती का नाही? बेजबाबदार फेरीवाल्यांमुळे कोल्हापुरात कोरोना वाढण्याची भीती

Last Updated : Nov 7, 2020, 4:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.