कोल्हापूर - शहरातील सीपीआर रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरला आज पहाटे 3 च्या दरम्यान आग लागली. शॉर्टसर्किटने ही आग लागली, मात्र यामध्ये मोठी दुर्घटना घडली नाही. याचे कारण म्हणजे एका रुग्णाच्या मुलाने म्हणजेच बळीराम केसरकर यांनी प्रसंगावधान राखत केलेली कामगिरी. वडिलांवर याच सेंटरमध्ये उपचार सुरू होते. मात्र, पहाटे अचानक सेंटरमधील आयसीयू नंबर 2 मध्ये आग लागली आणि मोठा अनर्थ घडू नये म्हणून सर्वात पहिले लाईटचे मेन स्विच बंद करत त्यांनी रुग्णांना बाहेर काढायला मदत केली. त्यांच्या या कामगिरीमुळे आता त्यांचे कौतुक होत आहे. पहाटे आग लागली तेंव्हा नेमकी काय होती परिस्थिती आणि कशा पद्धतीने केसरकर यांनी प्रसंगावधान राखत केली मदत याबाबत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद....
ईटीव्ही भारत विशेष : ट्रॉमा सेंटरमध्ये आग लागली तेंव्हा नेमकं काय घडले? 'हे' नसते तर घडली असती मोठी दुर्घटना... - कोल्हापूर सीपीआर आयसीयू आग बातमी
पहाटे अचानक सीपीआरच्या आयसीयूमध्ये मोठा आवाज झाला आणि आग लागल्याचे त्यांना समजताच आतमध्ये धाव घेत तिथला मेन स्विच त्यांनी बंद केला. शिवाय आरडा ओरडा करत इतर सुरक्षारक्षकांना आणि डॉक्टरांना बोलावले. काहींनी तात्काळ अग्निशमन दलाल याबाबत माहिती दिली. काही क्षणातच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी केसरकर यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.