कोल्हापूर : देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच नद्यांच्या पूररेषेचा गोंधळ झाला असून नागरिकांना पुराचा फटका सहन करावा लागत आहे, अशी टीका पर्यावरण अभ्यासक आणि चळवळीतील कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केली आहे. त्या कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधत होत्या.
मेधा पाटकर पुढे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक पातळीवर जाऊन पर्यावरणासंदर्भात मोठमोठी वक्तव्य करत आहेत. मात्र त्याच वेळी देशात काय परिस्थिती सुरू आहेत याकडे मात्र दुर्लक्ष आहे अशी देखील टीका पाटकर यांनी केली.
हेही वाचा - क्रुझ ड्रग्ज प्रकरणाची आजपासून NCB एसआयटीच्या 'स्पेशल 20'कडून चौकशी, आर्यनच्या अडचणी वाढणार?