ETV Bharat / city

उपमुख्यमंत्री अजित पवार दिवंगत आमदार चंद्रकांत जाधवांच्या घरी; कुटुंबियांचे केले सांत्वन - दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदान संघाचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या प्रतिमेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत आमदार जाधव यांच्या निवासस्थानी भेट देऊन जाधव कुटुंबियांचे सांत्वन केले.

MLA Chandrakant Jadhav
MLA Chandrakant Jadhav
author img

By

Published : Jan 18, 2022, 4:40 PM IST

कोल्हापूर - कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदान संघाचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या प्रतिमेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत आमदार जाधव यांच्या निवासस्थानी भेट देऊन जाधव कुटुंबियांचे सांत्वन केले. प्रा. एन. पाटील यांच्या अंत्यदर्शनासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी जाधव कुटुंबियांची सुद्धा भेट घेतली. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील सुद्धा उपस्थित होते.

MLA Chandrakant Jadhav
अजित पवार दिवंगत आमदार चंद्रकांत जाधवांच्या घरी
जाधव यांचे डिसेंबर महिन्यात झाले होते निधन -
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदानसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे डिसेंबर महिन्यात हैदराबाद येथे उपचार सुरू असताना निधन झाले होते. कोल्हापूर शहरातील लाडके आमदार अशी जाधव यांची ओळख होती. इथल्या पेठापेठांमध्ये जाधव यांचे समर्थक होते. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वच स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत होता. त्यांच्या निधनानंतर आता याठिकाणी पोट निवडणूक होणार असून ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ तसेच पालकमंत्री सतेज पाटील यांनी जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देऊन चंद्रकांत जाधव यांना श्रद्धांजली वाहू असे म्हटले होते. मात्र याठिकाणी भाजप आणि शिवसेना निवडणूक लावण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत असून येणाऱ्या काळात निवडणूक बिनविरोध होते की पुन्हा पूर्वीच्याच उमेदवारांसोबत लढत होते हेच पाहावे लागणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.