ETV Bharat / city

लॉकडाऊन काळात जप्त केलेल्या गाड्या परत घेण्यासाठी नागरिकांची गर्दी - Kolhapur Traffic Control Branch

लॉकडाऊन काळामध्ये विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करून त्यांच्या गाड्या जप्त करण्यात आल्या होत्या. अशा सर्वांच्या गाड्या पुन्हा परत दिल्या जात आहेत. त्यामुळे कोल्हापूर वाहतूक नियंत्रण शाखेच्या बाहेर नागरिकांची गर्दी बघायला मिळत आहे.

गाड्या परत घेण्यासाठी नागरिकांची भली मोठी रांग

author img

By

Published : May 24, 2021, 1:49 PM IST

कोल्हापूर - लॉकडाऊन काळामध्ये नियमांचे उल्लंघन करून घराबाहेर पडलेल्या अनेक वाहनधारकांवर कारवाई करून त्यांच्या गाड्या जप्त करण्यात आल्या होत्या. ज्यांच्या गाड्या जप्त करून सात दिवसांपेक्षा जास्त अवधी झाला आहे, अशा सर्वांना त्यांच्या गाड्या पुन्हा परत दिल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आपल्या गाड्या परत घेण्यासाठी आज कोल्हापूर वाहतूक नियंत्रण शाखेच्या बाहेर नागरिकांनी भली मोठी रांग लावल्याचे चित्र आज पाहायला मिळाले.

लॉकडाऊन काळात जप्त केलेल्या गाड्या परत घेण्यासाठी नागरिकांची गर्दी

सर्व कागदपत्रे तपासूनच गाड्या परत

लॉकडाऊन काळात जप्त केलेल्या गाड्या घेण्यासाठी आलेल्या प्रत्येक वाहन धारकांच्या गाड्यांचे कागदपत्र तपासूनच त्यांना गाड्या परत दिल्या जात आहेत. शिवाय सोशल डिस्टन्सचे नियम पाळले जात आहेत. तसेच प्रत्येक वाहनधारकांना टोकन देण्यात आले असल्याची माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी दिली आहे. जवळपास दोन हजारांहून अधिक गाड्या सध्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्या सर्वच गाड्या नागरिकांना परत दिल्या जात आहेत.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार

लॉकडाऊन काळामध्ये जप्त केलेल्या गाड्या आत्ता परत दिल्या जात आहेत. परंतु अजूनही विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी दिली. शिवाय प्रत्येकाने नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केले आहे.

हेही वाचा - 'कोव्हॅक्सिन'च्या लहान मुलांवरील क्लिनिकल चाचण्या जूनमध्ये होणार सुरू; भारत बायोटेकची माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.