ETV Bharat / city

संभाजीराजेंच्या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात दोन दिवसाचे अधिवेशन जाहीर करा - चंद्रकांत पाटील

102 व्या घटना दुरुस्तीनंतर राज्याला एखादी जात मागास आहे, हे ठरविण्याचा आणि आरक्षण देण्याचा अधिकार आहे हे सिद्ध होईल. केंद्राने याबाबत रिव्ह्यू दाखल केला आहे. गेल्या दीड वर्षांपासून राज्यात मागास आयोग नाही. त्याची सर्वात पहिला स्थापना करावी लागले. आपल्याला गेल्या दीड वर्षांपासून वेळ नाही. मात्र आता त्याची स्थापना करा, असाही उपरोधिक सल्लाही त्यांनी सरकारला दिला.

मराठा आरक्षणासंदर्भात दोन दिवसाचे अधिवेशन जाहीर करा

author img

By

Published : May 28, 2021, 1:16 PM IST

Updated : May 28, 2021, 1:37 PM IST

कोल्हापूर - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारने तातडीने दोन दिवसांचे अधिवेशन बोलवावे, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे. याच मागणीच्या पार्श्वभूमीवर आज(शुक्रवारी) मराठा समाजाने शहरातील शिवाजी चौक येथे लक्षणिक आंदोलन केले. यावेळी आंदोलनात सहभागी झालेले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा शासनाने कोरोना आणि मराठा आरक्षणाच्या विषयावर तातडीने अधिवेशन बोलावले पाहिजे अशी मागणी केली आहे.

चंद्रकांत पाटील - प्रदेशाध्यक्ष भाजपा
या आंदोलनात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, यांच्यासह शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, भाजप नेते धनंजय महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, यांच्यासह मराठा समाजातील नागरिक आणि पक्ष संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्ष बाजूला ठेऊन सर्वजण या आंदोलनात सहभागी झाले होते.

अधिवेशन घेण्याची हिंमत नाही-:

अधिवेशन घ्यावे याबाबत आपण वारंवार मागणी केली होती. मात्र याबाबत कोणताही भूमिका सरकारने घेतली नाहीये, असे विचारल्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले, अधिवेशन घेण्याची सरकारची हिंमत नाही, हिंमत असेल तर संभाजीराजे यांच्या सोबत आज मराठा आरक्षणप्रश्नी बैठक होणार आहे. त्या बैठकीत त्यांनी जाहीर करून टाकावे. त्यासाठी राज्यपाल यांना विनंती करावी लागते आणि राज्यपाल तारीख देतात. त्यामुळे कोरोना आणि मराठा आरक्षण या विषयावर तातडीने अधिवेशन बोलावले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सुचीत केले म्हंटले.

मागास आयोगाची स्थापना करा - चंद्रकांत पाटील

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, 102 व्या घटना दुरुस्तीनंतर राज्याला एखादी जात मागास आहे, हे ठरविण्याचा आणि आरक्षण देण्याचा अधिकार आहे हे सिद्ध होईल. केंद्राने याबाबत रिव्ह्यू दाखल केला आहे. गेल्या दीड वर्षांपासून राज्यात मागास आयोग नाही. त्याची सर्वात पहिला स्थापना करावी लागले. आपल्याला गेल्या दीड वर्षांपासून वेळ नाही. मात्र आता त्याची स्थापना करा, असाही उपरोधिक सल्लाही त्यांनी सरकारला दिला. हे सगळं काही न करता आपण दररोज दळण दळत बसणार हे चालणार नाही. त्यामुळे आता कोणीही मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी नेतृत्व करावे, आम्ही त्यांना पक्ष बाजूला ठेऊन पाठिंबा देतो, असेही स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिले .

मी आठ-आठ खाती सांभाळली आहेत, मला शिकवू नका - चंद्रकांत पाटील

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, आरक्षणाबाबत जे सुरू आहे ते सुरू राहील, पण आता सर्वात पहिला ज्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत, त्यांना तात्काळ नियुक्ती पत्र द्या. कोणत्या गोष्टीची आपण वाट पाहत आहात? मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही का? असा सवाल करत 'मी अनेक खाती सांभाळली आहेत, मला शिकवू नका' निर्णय घ्यायला किती वेळ लागतो, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी सरकारला लगावला आहे.

Last Updated : May 28, 2021, 1:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.