ETV Bharat / city

Vahan Kolhapuri Chappal : कोल्हापुरी चपलांसाठी तरुणाने सोडली आयटी क्षेत्रातील चांगल्या पगाराची नोकरी - kolhapuri shoes

कोल्हापुरी प्रेमासाठी भूषणने आपली चांगल्या पगाराची नोकरी सोडली आणि कोल्हापुरी चप्पल ( Vahan Kolhapuri Chappal ) जगभरात पोहोचावी आणि कारागीरांना देखील काम मिळावं यासाठी तो धडपड करू लागला.

Vahan Kolhapuri Chappa
Vahan Kolhapuri Chappa
author img

By

Published : Mar 31, 2022, 3:37 PM IST

मुंबई : कोल्हापूर ही रांगड्या क्रांतीकारांची भूमी. या कोल्हापूरचा थाटच वेगळा. कोल्हापूर म्हटलं की सर्वांना आठवतं तो तांबडा पांढरा रस्सा आणि कोल्हापुरी चप्पल. त्यामुळे अनेक जण कोल्हापूरच्या प्रेमात पडतात. असंच काहीसं एका आयटी इंजिनिअर सोबत झालेय. याच कोल्हापूर प्रेमातून या गड्यांना चक्क आपली आयटीतली नोकरी सोडून कोल्हापुरी चपलांचा व्यवसाय सुरू केला आहे.

वहाण ब्रँड
अशी झाली सुरुवात
भूषण कांबळे हा तरुण एका मल्टिनॅशनल कंपनीत आयटी इंजिनिअर म्हणून कामाला होता. त्याचा त्याचा पगार देखील त्याच्या कंपनीप्रमाणे अवाढव्य होता. पण, म्हणतात ना तुम्हाला एखाद्या गोष्टीची आवड असेल तर तुमचे पाय आपोआपच त्या दिशेला वळतात. असंच भूषणच्या बाबतीत झालं. त्याचं कोल्हापुरी प्रेम त्याच्या आयटी नोकरीत आड येत होतं. मग काय कोल्हापुरी प्रेमासाठी भूषणने आपली चांगल्या पगाराची नोकरी सोडली आणि कोल्हापुरी चप्पल जगभरात पोहोचावी आणि कारागीरांना देखील काम मिळावं यासाठी तो धडपड करू लागला.
वहाण ब्रँडची निर्मिती
1976 पासून मुंबईच्या खार परिसरात कांबळे परिवाराचा साई वैभव नावाने चपलांचा पिढीजात व्यवसाय आहे. भूषणच्या आजोबांनी हा व्यवसाय सुरू केला. या चपला मध्ये विशेष असं काही नावीन्य नव्हतं. मग भूषण ने कारागिरीला सुरुवात करून 2018साली कोल्हापूर चपलांचा 'वहाण' हा स्वतःचा ब्रँड सुरू केला. या ब्रँड मधून भूषणने कोल्हापुरी चपलांचे विविध पॅटर्न बनवायला सुरुवात केली. कोल्हापुरी चपलांवरती कोरीव नक्षीकाम, विविध वाद्यांची कामे भूषण आपल्या ब्रँड मधून करून देत असतो.
Vahan Kolhapuri Chappal
वहाण चपलांचे दुकान
जवळपास 150 कारागिरांना मिळाला रोजगार
भूषणच्या या ब्रँडमुळे जवळपास 150 कुशल कारागीरांना रोजगार मिळाला आहे. हे कारागीर आपल्या कौशल्यातून वर्षाला जवळपास 20,000 कोल्हापुरी चपला बनवतात व त्यांची विक्री होतेय.
परदेशांतून मागणी
भूषण सांगतात की, "आमच्या या चपलांना परदेशात देखील मागणी आहे. इतकंच काय बॉलिवूड आणि मराठी चित्रपट सृष्टीत देखील आमच्या चपलांना मागणी आहे. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी आमच्याकडे त्यांच्या पायांचे माप देऊन त्यांच्या आवडीच्या डिझाइननुसार चप्पल बनवून घेतात. त्याचप्रमाणे चित्रपटांमध्ये देखील चपला हव्या असल्यास त्या आमच्याकडून नेल्या जातात."

हेही वाचा - ED Raid in Nagpur : फडणवीसांविरोधातील सर्व पुरावे लॅपटॉप आणि मोबाईल मध्ये, ईडीने तेच जप्त केले; शेखर उके यांचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.