ETV Bharat / city

Beed sugarcane workers Supplier Murder : बीडच्या मुकादमाची कोल्हापुरात हत्या; नदीत आढळला मृतदेह - Body found in Hiranyakeshi river in Kolhapur

कोल्हापुरात एक धक्कादायक घडना उघडकीस आली आहे. ऊस तोडणीसाठी मजूर पुरवठा करणाऱ्या बीड जिल्ह्यातील मुकादमाचे अपहरण करून कोल्हापुरात खून झाला ( Beed sugarcane workers Supplier Murder ) आहे. त्याचा मृतदेह नदीत आढळला आहे.

Beed sugarcane workers Supplier Murder
ऊसतोड मजूर पुरवठा करणाऱ्या व्यक्तीची कोल्हापुरात हत्या
author img

By

Published : Mar 16, 2022, 7:32 PM IST

Updated : Mar 16, 2022, 8:04 PM IST

कोल्हापूर - कोल्हापुरात एक धक्कादायक घडना उघडकीस आली आहे. येथे बीड जिल्ह्यातील एका ऊसतोड मजुराचा पुरवठा करणाऱ्या मुकादमाचा मृतदेह नदीत आढळला आहे. आपत्ती व्यवस्थापन पथकाने अथक प्रयत्न केल्यानंतर हिरण्यकेशी मृतदेह नदीतून ( Body found in Hiranyakeshi river in Kolhapur ) बाहेर काढला. बीडमधील केज पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

नदीत आढळला मृतदेह -

ऊस तोडणीसाठी मजूर पुरवठा करणाऱ्या बीड जिल्ह्यातील मुकादमाचे अपहरण करून कोल्हापुरात खून झाला आहे. सुधाकर हनुमंत चाळक (रा. लव्हुरी, ता. केज, जि. बीड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मारेकऱ्यांनी खून करून मृतदेह गडहिंग्लज तालुक्यातील नांगणूर बांधऱ्यावरून हिरण्यकेशी नदीत फेकून दिला असून मृतदेहाचे धड सापडले असून शीर अजूनही शोधत आहेत.

आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून शीराचा शोध सुरूच -

बीड जिल्ह्यातील सुधाकर चाळक हे बीडमधील महालक्ष्मी साखर कारखान्यात कामगार पुरविण्याचे काम करतात. त्यांनी काही दिवसापुर्वी भुदरगड तालुक्यातील कडगावच्या दत्तात्रय देसाई यांच्याकडून ऊस तोडणी मजुरांची टोळी पुरविण्यासाठी पैसे घेतले होते. मात्र पैसे घेऊनही कामगार पुरवले नसल्याने त्यांनी आपले पैसे परत मागितले. मात्र ते देण्यास त्यांच्याकडून टाळाटाळ होऊ लागली. त्याच रागातून त्यांनी सुधाकर चाळक यांना इतर दोघांच्या मदतीने अपहरण करून महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील खणदाळ येथे आणून ठेवले. तिथुनच त्यांनी सुधाकर यांच्या मुलांना फोनवरून 12 लाख रुपये घेऊन यायला सांगितले. अन्यथा त्यांना ठार मारू अशी धमकी दिली. शिवाय मारहाण सुद्धा केली. दरम्यान, याच मारहाणीत सुधाकर यांचा मृत्यू झाला. त्यामुळे देसाई यांनी तुकाराम मुंढे, रमेश मुंढे यांच्या मदतीने त्यांचे धड शिरा वेगळे करून गडहिंग्लज तालुक्यातील नांगनूर येथील हिरण्यकेशी नदीत फेकून दिले. दरम्यान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने हा मृतदेह बाहेर काढला आहे. मात्र या मृतदेहाचे शीर सापडलेले नसून त्याचा शोध अद्याप ही सुरूच आहे, असे तक्रारीत म्हटलेले आहे.

आरोपींना 27 मार्चपर्यंत कोठडी -

याबाबत बीडमध्ये तक्रार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरून बीडमधील पोलिसांनी कोल्हापूरात येत तात्काळ छडा लावला. शिवाय संशयित आरोपी दत्तात्रय देसाई ( रा. कडगाव, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर), तुकाराम मुंढे (रा. धारूर, जि. बीड) आणि रमेश मुंढे (रा. वडवणी, जि. बीड) या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानुसार त्यांना न्यायालयात हजर केले असता 17 मार्च पर्यंत त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

हेही वाचा - Elderly Couple Murder Parbhani : परभणीत वृद्ध दाम्पत्याचा निर्घृण खून; मेहुणीसोबत तरुण आला होता मुक्कामी!

Last Updated : Mar 16, 2022, 8:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.