ETV Bharat / city

Agitation to save Jayaprabha Studio : जयप्रभा स्टुडिओ वाचवण्यासाठी कलाकार आक्रमक, पंचगंगा नदीत उड्या घेत केले अर्धनग्न आंदोलन - जयप्रभा स्टुडिओ वाचवण्यासाठी आंदोलन

गेल्या 98 दिवसापासून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि कलाकारांच्या वतीने आंदोलन सुरू आहे. मात्र याची दखल अद्यापही घेतली नसल्याने आता चित्रपट महामंडळाचे कलाकार आक्रमक झाले आहेत. कलाकारांनी कोल्हापूर शहरात आंदोलनाचा धडाका सुरुच ठेवला आहे. रोज शहरातील वेगवेगळ्या चौकात जाऊन ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. तसेच आज कलाकारांनी पंचगंगा नदीत उड्या ( Artist aggressively jumps into Panchganga ) घेत अर्धनग्न आंदोलन केले.

जयप्रभा स्टुडिओ
जयप्रभा स्टुडिओ
author img

By

Published : May 22, 2022, 7:57 PM IST

कोल्हापूर: जयप्रभा स्टुडिओ शुटींगसाठी खुला ( Jayaprabha Studio must open for shooting ) झालाच पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी गेल्या 98 दिवसापासून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि कलाकारांच्या वतीने आंदोलन सुरू आहे. मात्र याची दखल अद्यापही घेतली नसल्याने आता चित्रपट महामंडळाचे कलाकार आक्रमक झाले आहेत. कलाकारांनी कोल्हापूर शहरात आंदोलनाचा धडाका सुरुच ठेवला आहे. रोज शहरातील वेगवेगळ्या चौकात जाऊन ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. तसेच आज कलाकारांनी पंचगंगा नदीत उड्या घेत अर्धनग्न आंदोलन केले. आज या आंदोलनाचा 98 वा दिवस असून या आंदोलनास अनेक जणांचा पाठिंबा ही मिळाला आहे. तसेच अनेक नेते मंडळी ही उपोषणास भेट देऊन गेले, मात्र अद्याप ही सरकारकडून या आंदोलनाची दखल घेतली गेली नसल्याचा आरोप कलाकारांनी केला आहे.

जयप्रभा स्टुडिओ वाचवण्यासाठी कलाकार आक्रमक

अनेक नेत्यांची भेट मात्र दखल नाही -

अखिल भारतीय मराठी चित्रपट महासंघाने गेल्या 98 दिवसांपासून जयप्रभा स्टुडिओच्या दरात बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. जयप्रभा स्टुडिओची जागा ही दोन वर्षापूर्वीच विक्री झाल्याचे समोर आल्यानंतर कोल्हापूरकर आणि कलाकार आक्रमक झाले आहेत. ही जागा श्री महालक्ष्मी स्टुडिओज एलएलपी या कंपनीच्या दहा भागीदाराणी खरेदी केली आहे. यामध्ये राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची दोन मुले ऋतुराज राजेश क्षीरसागर आणि पुष्कराज राजेश क्षीरसागर यांच्यासह 8 जणांचा समावेश आहे. दरम्यान तब्बल 77 दिवसांनी राजेश क्षीरसागर यांनी या स्टुडिओस आणि आंदोलकांना भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी जयप्रभा स्टुडिओ परिसराची पाहणी करत आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र आंदोलक आंदोलनावर ठाम होते, जोपर्यंत स्टुडिओ ताब्यात मिळत नाही किंवा ठोस निर्णय होत नाही, तो पर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे म्हटले होते.

असे असणार या पुढील आंदोलन -

गेल्या 98 दिवसापासून आंदोलन सुरू आहे, मात्र सरकारने व महापालिकेने आंदोलकांना तोंडी आश्वासनाशिवाय काहीही दिले नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या कलाकारांनी रोज वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत असून दिनांक 18 ते 21 मे दरम्यान शहरातील विविध भागात ठिय्या आंदोलन करण्यात आले. आज पंचगंगा घाट येथे पंचगंगा नदीत अर्धनग्न आंदोलन करण्यात आले आहे, तर उद्या दिनांक 23 मे रोजी पालकमंत्री सतेज पाटील ( Guardian Minister Satej Patil ) यांच्या कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात येणार आहे. साखळी उपोषनाच्या 100व्या दिवशी म्हणजे 24 मे ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे सांगण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?

कोल्हापुरची अस्मिता आणि भालजी पेंढारकर ( Bhalji Pendharkar ) यांच्या कार्याची एकमेव आठवण असलेल्या जयप्रभा स्टुडिओची तब्बल 6 कोटी 50 लाखांना विक्री झाली आहे. कोल्हापुरकरांनी लता मंगेशकर यांच्याविरोधात जाऊन जागा विक्री विरोधात लढा दिला होता. त्याच कोल्हापुरकरांच्या डोळ्यात धूळ फेकत ही जागा दोन वर्षांपूर्वीच विक्री झाल्याचे उघड झाले होते. जी जागा हेरिटेज वास्तू मध्ये होती. त्याचीच विक्री झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

या आहेत मागण्या -

1.जयप्रभा स्टुडिओ चित्रीकरणासाठी तात्काळ खुला झाला पाहिजे.

2.जयप्रभा स्टुडिओ मधील इमारतीसह खुली जागा आरक्षित रहावी व चित्रीकरण या व्यतिरिक्त त्याचा कोणताही व्यावसायिक वापर होऊ नये.

3.कोल्हापूर महानगरपालिकेने जयप्रभा स्टुडिओच्या व्यावसायिकीकरण/वाणिज्य वापरासाठी परवानगी देऊ नये.

4. जयप्रभा स्टुडिओ याचे जतन होण्याकरिता शासनाने व कोल्हापूर महानगर पालिकेने लक्ष घालावे.

हेही वाचा - कोल्हापुरातील मातृलिंग मंदिरात महेश काळेंनी गायला मंत्रमुग्ध करून टाकणारा अभंग

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.