कोल्हापूर - कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री. अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात भाविकांना दर्शनासाठी ई-पासची सक्ती करण्यात आली होती. ई-पास शिवाय कोणत्याही भाविकाला मंदिरामध्ये दर्शन घेता येत नव्हते. मात्र, आता ई-पासची सक्ती रद्द करण्यात आलेली ( Ambabai Jyotiba Temple E Pass Cancelled ) आहे. यामुळे श्री. अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात भाविकांना दर्शनासाठी ई-पासची आवश्यकता भासणार नाही आहे.
पास सक्ती रद्द करण्यासाठी आंदोलन
कोरोना काळात लावलेले सर्व निर्बंध शिथिल करुन, मंदिराचे सर्व दरवाजे उघडावे. तसेच, ई-पास सक्ती रद्द करण्यासाठी हजारो गुरव आणि ग्रामस्थ बेमुदत ठिय्या आंदोलनास बसले होते. तर, चैत्र यात्रेपूर्वी निर्णय घेण्यात यावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलकांकडून देण्यात आला होता. यानंतर आंदोलनात स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी मध्यथी करुन ई-पास सक्ती रद्द करण्याचे निर्देश मंदिर समितीला दिले.
कोरोना संसर्ग काळात प्रतिबंधात्मक नियम पाळत भाविकांना दर्शन दिले जात होता. तेव्हा लहान मुलांना मंदिरात प्रवेश बंदी होती. तर, सर्व भाविकांना श्री. अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात भाविकांना ई-पास बंधनकारक करण्यात आला होता. मात्र, स्थानिकांचा ई-पासला विरोध होता. ई-पास सुविधा रद्द करुन मंदिरातील सर्व दरवाजे उघडावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार आज ( रविवार ) पासून ही पास सक्ती रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे रविवार सुट्टीचा दिवस असल्याने श्री. अंबाबाई मंदिरात आणि खेटे असल्याने ज्योतिबा मंदिरात प्रचंड गर्दी झाली आहे.
हेही वाचा - Notice to Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांना आलेल्या नोटीसची भाजपकडून होळी