ETV Bharat / city

कोल्हापूर : नवरात्रीनिमित्त आकांशाची 'नव'राईड

आकांक्षा ही 19 वर्षाच्या औरंगाबादच्या दुचाकीवरून साडेतीन शक्तिपीठांच्या दर्शनाचा संकल्प केला आहे. राज्यातील नऊ दुर्गांचा दर्शन करण्याचा ध्यास तिने नवरात्रीच्या निमित्ताने केला आहे.

AKANKSHA TAMMEVAR
AKANKSHA TAMMEVAR
author img

By

Published : Oct 9, 2021, 6:37 PM IST

कोल्हापूर - नवरात्र उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर आकांक्षा तम्मेवार या एकोणीस वर्षाच्या दुचाकीस्वार मुलीने नऊ दुर्गा दर्शनाचा ध्यास घेतला आहे. शनिवारी ती कोल्हापुरातील करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी पोहोचली आहे. तब्बल दोन हजार किलोमीटरचा प्रवास करत आकांशा ही राज्यातील नवदुर्गांचा दर्शन घेऊन पुन्हा औरंगाबादमध्ये या बाईक राईडची सांगता करणार आहे.

नवरात्रीनिमित्त आकांशाची 'नव'राईड
आकांक्षा ही 19 वर्षाच्या औरंगाबादच्या दुचाकीवरून साडेतीन शक्तिपीठांच्या दर्शनाचा संकल्प केला आहे. यासाठी आकांशा ही औरंगाबाद येथून रवाना झाली आहे. राज्यातील नऊ दुर्गांचा दर्शन करण्याचा ध्यास तिने नवरात्रीच्या निमित्ताने केला आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लासूरच्या दाक्षायणी देवीचे दर्शन घेत तिने आपल्या प्रवासाला सुरुवात केली. ती एकटीच प्रवासाला निघाली आहे. ती मेकॅनिकल इंजिनीयरच्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे. आठवीपासूनच तिला काहीतरी वेगळे करण्याचा छंद होता. आत्तापर्यंत तिने आव्हानात्मक खरदुंगला खिंड बुलेटवर सर केली आहे. त्यामुळे इंडिया बुक रेकॉर्ड आणि गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड यामध्ये तिची नोंद झाली आहे.दोन हजार किमीचा प्रवास लासूरनंतर आकांक्षाही वणी, पुणे, कोल्हापूर, तुळजापूर, माहूर, अमरावती असे दर्शन घेत औरंगाबाद येथून मोहिमेची सांगता करणार आहे. दरम्यान शनिवारी बारा वाजता ती कोल्हापुरातील अंबाबाई दर्शनासाठी पोहोचली आहे. औरंगाबाद येथून प्रवास केल्यानंतर आकांशा ही नाशिक मधील सप्तशृंगी देवीचे दर्शन घेऊन ती पुणे येथे चतुश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी आली. तेथून अडीचशे किलोमीटरचा प्रवास करत ती कोल्हापुरात दाखल झाली आहे. रविवारी सकाळी दर्शन घेऊन ती तुळजापुरातील भवानी देवीच्या दर्शनासाठी निघणार आहे. त्यानंतर नांदेड जवळच्या सरस्वती देवीचे दर्शन घेणार आहे. पुढे माहुरगड, अमरावती, वाशिम येथून पुन्हा औरंगाबाद येथे राईडची सांगता करेल. हा संपूर्ण प्रवास दोन हजार किलोमीटर इतका असल्याचे आकांक्षा तम्मेवर हिने सांगितले. हेही वाचा - Navratri 2021 : नवरात्रोत्सवासाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर, वाचा सविस्तर...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.