पुणे / कोल्हापूर / सोलापूर - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ( रविवारी ) पुण्यात सभा घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( NCP President Sharad Pawar ) यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच त्यांनी यावेळी एमआयएम ( AMIM ) आणि औरंगाबादच्या नामांतरावरूनही महाविकास आघाडी सरकार ( Mahavikas Aghadi government ) आणि उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला. त्यांच्या या सभेनंतर आता विविध राजकीय नेत्यांनी राज ठाकरेंच्या भाषणा प्रतिक्रिया देत टीका केली. यात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ ( Rural Development Minister Hasan Mushrif ), राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण ( NCP Women State President Vidya Chavan ), समाजवादी पक्षाने नेते अबु आझमी ( Samajwadi Party leader Abu Azmi ) यांनी राज ठाकरेंवर टीका करत प्रतिउत्तर दिले आहे.
हसन मुश्रीफ, ग्रामविकास मंत्री : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात सभा घेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे. शरद पवारांना औरंगजेब हा सोफी संत वाटतो? असा खोचक टोला त्यांनी लगावला असून स्वतःच्या राजकारणासाठी तुम्ही इतिहास बदलणार आहात का असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तर यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज ठाकरेंना उत्तर देत एक प्रकारचा इशाराच दिला आहे. हसन मुश्रीफ म्हणाले, राज ठाकरे अगोदर शरद पवार यांचे कौतुक करायचे मात्र आता ते जे बोलत आहेत, त्यामागे त्यांचे काहीतरी स्वार्थ दडले आहे, हे दिसून येत आहे. वास्तविक पाहता शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून त्यांच्याबद्दल अशाप्रकारे बोलणे योग्य नाही. मात्र ते बोलत आहेत. राज ठाकरे शरद पवार यांच्यावरच्या पद्धतीने टीका करत आहेत, हे आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुळीच सहन करणार नाही, असा इशारा मुश्रीफ यांनी राज ठाकरेंना इशारा दिला आहे. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या सभेला पहिल्याप्रमाणे जनतेचा प्रतिसाद मिळत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.
विद्या चव्हाण, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षा : राज ठाकरे हे भरकटलेले नेते आहेत, त्यांना कधीही शरद पवार होता येणार नाही. शरद पवार समजून घेण्यासाठी अगोदर त्यांची 4-5 पुस्तके वाचावी लागतील. शरद पवारांवर टीका करून अनेक नेते मोठे झाले आहेत. कुठे गेली राज ठाकरेंची ब्लू प्रिंट. त्याच्या माध्यमातून ते महाराष्ट्राचा विकास करणार होते. निश्चित त्यांच्या मनात राज्याविषयी तळमळ आहे ते चांगले वक्ते आहेत. त्यांचे व्हिजन आहे मात्र ते सध्या भरकटल्या सारखे करत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी केली. त्या सोलापुरात बोलत होत्या.
अबू आझमी, नेते, समाजवादी पक्ष : बिचारे राज ठाकरे खूप परेशान आहेत. क्या होगा मेरा, अशी स्थिती आहे. शोले चित्रपटात झाले ते होणार, अशी टीका अबू आझमी यांनी केली आहे. त्यांचे राजकारण संपलय, त्यांना विचारणारे कोणी नाही. मी जेव्हा शपथ घ्यायला गेलो तेव्हा स्पीकर साहेबांना विचारले होत शपथ कुठल्या भाषेत घेऊ. त्यांनी सांगितलं होते, भारतातील कुठल्याही भाषेत शपथ घेऊ शकता. तर मनसेने मराठी, हिंदीवरून किती मोठा गोंधळ केला हे सर्वांनी पाहिले आहे. उत्तर भारतीयांना त्यांनी मारहाण केली. हे सर्व त्यांनी मराठी नागरिक त्यांना साथ देतील म्हणून केले. परंतु, त्यांना मराठी बांधवांनी साथ दिली नाही. अयोध्याला कसे जाणार त्यांच्यात हिम्मत नाही. राज ठाकरे यांनी जे केले आहे ते भराव लागेल. ज्या उत्तर प्रदेशात राम भगवान, कृष्ण यांचा जन्म झाला त्याच उत्तर भारतीयांना सन्मान द्यायला हवा होता. राज ठाकरे यांचे बहाणे आहेत. त्यांच्यात हिम्मत नाही, ते घाबरले आहेत. भाजपाचा आमदार म्हणतोय त्यांना येऊ देणार नाही, हे सर्व मिली जुली है, उत्तर भारतीयांची त्यांनी माफी मागावी, माफ केले तरच त्यांनी अयोध्येला जावे. सन्मानासाठी उत्तर भारतीय जीव देतील. राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलला आहे, म्हणून त्यांना महाविकास आघाडी अटक करत नाही, अशी टीका अबू आझमी यांनी केली आहे.