कोल्हापूर - राज्यातील एसटी वाहकांच्या तिकीट काढण्यासाठी हातात असणारे ईटीआयएम मशीनच ३४ हजार वाचकांच्या खिशाला कात्री लावण्याचे काम करत आहे. काही मशिन जुने झाल्याने तांत्रिक बिघाड होऊ लागला आहे. त्यामुळे तिकीट डबल येणे, बॅटरी फुटणे, तिकीट न येणे असे प्रकार घडत आहेत. त्याचा फटका प्रत्यक्ष वाहकांना बसत आहे. त्याची भरपाई एसटी महामंडळ वाहकांकडून वसूल करत असल्याने, आम्ही नोकरी कशी करायची असा सवाल वाहक करत आहे. नेमका काय आहे प्रकार पाहुयात ईटीव्ही भारतच्या स्पेशल रिपोर्ट मधून..
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्याकडून गेल्या सहा वर्षांपूर्वी राज्यातील ३४ हजार वाहकांसाठी ३८ हजार 'ईटीआयएम' मशीन खरेदी करण्यात आली. त्या माध्यमातून डिजिटल तिकीट प्रणाली कार्यान्वित झाली. एकाच मशीन मधून समान तिकीट मिळू लागल्याने कागद, वेळेची बचत झाली. त्यासाठी राज्यातील सर्व वाहकांना या 'ईटीआयएम' मशीन कसे हाताळायचे याचे प्रशिक्षण दिले. हे सुरळीतपणे सुरू असताना सहा वर्षानंतर मशीनची वयोमर्यादा, रोजचा होणारा वापर, त्याला आवश्यक असणारा बॅटरी पॅकअप काही प्रमाणात कमी झाला आहे. तर अनेक मशीन तांत्रिक दृष्ट्या खराब झाले आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम प्रवाशांचा तिकीट काढताना होत आहे.
हे ही वाचा - पुणे कोरोना अपडेट: दिवसभरात २८३४ पॉझिटिव्ह
डिजिटल कडून पुन्हा कागदी तिकीटपेटीकडे -
बऱ्याच वेळा या मशीन मधून तिकीट येत नाही, बॅटरी संपल्याने त्याचा वापर करता येत नाही. अशा वेळी पुन्हा जुन्या पद्धतीने वाहकांना तिकीट द्यावे लागते. असा प्रकार होत असेल तर हे ईटीआयएम मशीन वापरण्यास बंधनकारक का? असा सवाल वाहक करतात.
वाचकांचा नाईलाज व प्रवाशांचा सामना -
अनेक वेळा प्रिंट नसलेले तिकीट स्वीकारण्यास प्रवासी तयार नसतात. त्यामुळे त्यांना साधे तिकीट द्यावे लागते. काही वेळा तर प्रवासी वाहकांना विनाकारण हुज्जत घालतात. त्यामुळे चारी बाजूने आमचे हाल, अशी मानसिकता वाचकांची आहे.
हे ही वाचा - महाराष्ट्रातील दुसरी लाट पहिल्या कोरोना लाटेपेक्षा भयानक असणार - डॉ.अविनाश भोंडवे
मशीन बदला, तांत्रिक चुकीमुळे आमचे पगार कापू नका -
अनेक मशीनचा फटका वाहकांना बसत आहे. त्याची रक्कम वाहकांच्या पगार मधून वसूल केली जाते. त्यामुळे याच्या तक्रारी विभागीय मंडळाकडे केल्या आहेत. हे मशीन बदलून द्यावेत, अशी मागणी वाहकांनी केली आहे.