ETV Bharat / city

विषयच नाय..! गटारी अन् कोल्हापूर... 2 हजार बकऱ्या, साडेचार टन चिकन फस्त

आजपासून (सोमवार) संपूर्ण जिल्ह्यात 26 जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे पुढचे सात दिवस मटण, चिकन तर मिळणार नाहीच, शिवाय श्रावण सुद्धा सुरू होणार असल्याने कोल्हापुरातील नागरिकांनी रविवारी मटण, चिकन आणि माशांवर ताव मारल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

Mutton chicken Sale in Kolhapur
चिकन मटन कोल्हापूर
author img

By

Published : Jul 20, 2020, 5:50 PM IST

Updated : Jul 21, 2020, 5:57 PM IST

कोल्हापूर - तांबडा-पांढऱ्या रस्स्यासाठी कोल्हापूरची देशभरात एक वेगळी ओळख आहे. तांबडा-पांढरा रस्सा आणि मटणावर कोल्हापूरकर नेहमीच अक्षरशः तुटून पडतात. याचीच प्रचिती रविवारी गटारी निमित्ताने आली. एका दिवसात जवळपास 2 हजाराहून अधिक बकऱ्या आणि साडेचार टनाहून अधिक चिकनवर कोल्हापूरकरांनी ताव मारला आहे. एव्हढेच नाही तर दोन दिवसांत जवळपास आठ कोटी रुपयांची उलाढाल दारू विक्रीतून झाली आहे.

रविवारी गटारीच्या दिवशी कोल्हापूरमध्ये 2 हजार बकरऱ्याचे मांस आणि साडे चार टन चिकनची विक्री...

नेहमीच गटारी पौर्णिमेला मोठ्या प्रमाणात मटण, चिकनची विक्री होत असते. मात्र, यावेळी चित्र वेगळेच पाहायला मिळाले. आजपासून (सोमवार) संपूर्ण जिल्ह्यात 26 जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये मेडिकल, बँक आणि दूध व्यवसायाचा समावेश आहे. किराणा आणि भाजी मार्केट सुद्धा सुरू करण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे पुढचे सात दिवस मटण, चिकन तर मिळणार नाहीच, शिवाय श्रावण सुद्धा सुरू होणार असल्याने कोल्हापुरातील नागरिकांनी रविवारी मटण, चिकन आणि माशांवर ताव मारल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा - 'स्वाभिमानीचे आंदोलन म्हणजे मॅच फिक्सिंगसारखा दूध फिक्सिंगचा प्रकार'

कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास एकूण 600 मटण दुकाने आहेत. त्यापैकी कोल्हापूर शहरात 160 नोंदणीकृत दुकाने आहेत. यामध्ये ग्रामीण भागात रविवारी दिवसभरात जवळपास 1400 ते 1500 बकऱ्यांच्या मटणाची, तर एकट्या शहरात 700 हून अधिक बकऱ्यांच्या मटणाची विक्री झाली आहे. तब्बल साडेचार टन चिकनचीही विक्री झाली असल्याचे कोल्हापूर खाटीक समाजाचे अध्यक्ष विजय कांबळे यांनी ईटीव्ही भारतला माहिती दिली. दरम्यान, मटण मार्केटमध्ये रविवारी पहाटेपासूनच नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. अशी गर्दी आम्ही यापूर्वीच्या 20 वर्षांत पाहिली नाही, असेही इथल्या विक्रेत्यांनी म्हटले आहे.

एव्हढेच नाही तर दोन दिवसांत कोल्हापूर जिल्ह्यात दारू विक्रीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. दोन दिवसांत तब्बल 8 कोटींची उलाढाल केवळ दारूमधून झाल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी ईटीव्हीला माहिती दिली. यामध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागातून सव्वा चार कोटी, तर कोल्हापूर शहर परिसरातून 3 कोटी 70 लाख इतकी उलाढाल झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, कोल्हापुरात आजपासून लॉकडाऊन सुरू झाला आहे. त्यामुळे मटण मार्केटमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुढच्या रविवारीच म्हणजेच लॉकडाऊन उठल्यानंतर आता कोल्हापुरातील नागरिकांना मटण चिकनवर ताव मारता येणार आहे.

हेही वाचा - उत्तराखंडच्या पिथौरागडमध्ये ढगफुटी; तीन जणांचा मृत्यू, 11 जण बेपत्ता

Last Updated : Jul 21, 2020, 5:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.