ETV Bharat / city

डोंबिवली इमारत दुर्घटना : १७ वर्षीय तरुणाच्या सतर्कतेमुळे वाचले ७५ रहिवाशांचे जीव - building part collapsed in kalyan dombivali

डोंबिवलीतील दोन मजली धोकादायक इमारतीचा अर्धा भाग कोसळल्याची घटना काल पहाटेच्या सुमारास घडली होती. मात्र, याच दुर्घटनाग्रस्त इमारतीत राहणाऱ्या एका १७ वर्षीय तरुणाच्या सतर्कतेमुळे इमारतीमधील राहणाऱ्या ७५ रहिवाशांचे जीव बचावल्याचे समोर आले आहे.

kunal mohite
कुणाल मोहिते
author img

By

Published : Oct 30, 2020, 7:19 PM IST

ठाणे - डोंबिवलीतील दोन मजली धोकादायक इमारतीचा अर्धा भाग कोसळल्याची घटना काल पहाटेच्या सुमारास घडली होती. मात्र, याच दुर्घटनाग्रस्त इमारतीत राहणाऱ्या एका १७ वर्षीय तरुणाच्या सतर्कतेमुळे इमारतीमधील राहणाऱ्या ७५ रहिवाशांचे जीव बचावल्याचे समोर आले आहे. कुणाल मोहिते असे या तरुणाचे नाव असून तो याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावर कुटूंबासह राहत होता.

कुणाल मोहिते

असा आहे घटनाक्रम -

डोंबिवली पश्चिम कोपरमधील मुख्य रस्त्याला लागून मैना विठू निवास या नावाची दोन मजली इमारत ४२ वर्षे जुनी होती. लोडबेअरिंग पद्धतीने बांधण्यात आलेल्या या इमारतीमध्ये साधारण १४ कुटुंबातील सुमारे ७५ रहिवासी राहत होते. काल पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास इमारतीचा सज्जा कोसळला. त्यावेळी इमारतीमधील पहिल्या मजल्यावर राहणारा कुणाल मोहिते हा पहाटेपर्यंत टीव्ही पहात होता. त्यावेळी किचनच्या खिडकीतून त्याने आवाज ऐकला आणि त्याने क्षणाचाही विलंब न करता आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तसे त्या धोकादायक इमारतीमध्ये राहणारे रहिवासी लगेचच १० मिनिटात त्यांनी इमारतीच्या बाहेर पळ काढला. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. अन्यथा याठिकाणी मोठी जीवितहानी झाली असती. रात्रीपासूनच या इमारतीमध्ये माती कोसळण्यास सुरुवात झाली होती. परंतु, या रहिवाशांनी महापालिकेला कळवले नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

इमारत रिकामी करण्याची दिली होती नोटीस -

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी याठिकाणी दाखल झाले. त्यानंतर इमारतीचा उर्वरित भागही पाडण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती प्रभाग अधिकारी भरत पवार यांनी दिली आहे. तर, ही इमारत अतिधोकादायक जाहीर करून इमारत मालकाला इमारत रिकामी करण्यास नोटीसही बजावण्यात आली आहे. मात्र, तरीसुद्धा येथील रहिवाशांनी इमारत रिकामी केली नव्हती. तर परिसरातील शिवसेनेचे माजी परिवहन सभापती संजय पावसे यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने इमारतीमध्ये राहणाऱ्या १४ कुटुंबाचे संसारउपयोगी साहित्य ढिगाऱ्याखालून काढण्यास मदतकार्य केले. तसेच बेघर झालेल्या या कुटूंबांचे एका हॉलमध्ये स्थलांतर करून त्यांच्या जेवण व राहण्याची सोय शिवसेनेच्यावतीने करण्यात आल्याची माहिती संजय पावसे त्यांनी दिली.

संबंधीत बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा -

डोंबिवलीत धोकादायक इमारतीचा अर्धा भाग कोसळला; टीव्ही पाहणाऱ्या व्यक्तीमुळे टळली जीवितहानी

याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी इमारत दुर्घटनेची चौकशी सुरू केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.