ठाणे - डोंबिवली पश्चिम भागातील बावनचाळ परिसरातील रेल्वे मैदानात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अद्याप पोलिसांना मृतदेहाची ओळख पटली नसून त्या दिशेन तपास सुरु आहे. मृतदेहाच्या डोक्यावर जोरदार प्रहार केल्याच्या खुणा दिसत असल्याने त्याची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. या प्रकरणी डोंबिवलीतील विष्णूनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे.
डोक्यात दांडक्याने जोरदार प्रहार केल्याचा अंदाज - पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 13 जून) दुपारच्या सुमरास डोंबिवली पश्चिमेला बावनचाळ परिसरातील रेल्वे मैदानात एका व्यक्तीचा मृतदेह पडल्याची माहिती विष्णूनगर पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतला असता त्या अनोखळ्या व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. साधारणतः 45 ते 50 वयोगटातील या व्यक्तीच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने जोरदार प्रहार केल्याचे त्याचा जागीच मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
हत्येचा तपास सुरू - मृतदेहाची ओळख पटली नसली तरी पोलीस मृतदेहाची माहिती काढण्यासाठी चौकशी सुरू केली आहे. बावनचाळीत परिसरात रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन या व्यक्तीला मारले असावे. पण, त्याची हत्या करण्यामागे काय उद्देश असावा ?, कोणी हत्या केली असावी ?, याबाबlचा तपास विष्णूनगर पोलीस करत आहे. दरम्यान, बावनचाळीत रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवणे आवश्यक झाले आहे.
हेही वाचा - कल्याणमधील काँक्रीटीकरण रस्ताचे कामे थांबवा; वाहतूक विभागाचे ‘एमएसआरडीसी’ला पत्र