ठाणे - पैशांसाठी एकाचे त्याच्याच तीन मित्रांनी अपहरण केले. त्याला एका खोलीत डांबून त्याचे हात बांधून ठेवत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे अपहरण केलेल्या मित्राला बांधून मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तिघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
प्रशांत गामने (रा. रामबाग परिसर, कल्याण पश्मिच) याने याबाबत तक्रार दिली होती. त्यावरुन पोलिसांनी दीपक तांबेसह त्याचे दोन साथीदारांना अटक केली आहे.
राहत्या घरातून केले अपहरण...
कल्याण पश्चिमेकडील रामबाग परिसरात प्रशांत गामने हा तरुण आपल्या कुटुंबासोबत राहतो. दोन दिवसांपूर्वी सकाळच्या सुमारास प्रशांत घरी असताना त्याचे आरोपी मित्र त्याच्या घरी आले. त्यावेळी तिघांनी त्याला जबदरस्तीने घराबाहेर खेचून एका वाहनात कोंबून अपहरण केले. त्यानंतर एका इमारततील खोलीत नेऊन त्याच्याकडे पैशाची मागणी केली. मात्र, प्रशांतने पैसे देण्यास नकार दिल्याने या तिघांनी प्रशांतला बांधून ठेवत बेदम मारहाण केली होती.
पैसे घेऊन येतो सांगत अपहरणकर्त्यांच्या तावडीतून काढला पळ...
हात बांधून बेदम मारहाण करत असतानाच पैसे घेऊन येतो, असे सांगत अपहरणकर्त्यांच्या तावडीतून प्रशांतने पळ काढला. त्यानंतर कसाबसा घरी पोहोचल्यानंतर त्याने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. दरम्यान, या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
तिघांना अटक
या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून काल एका अटक केली तर आज दोघांना अशा तिघाही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
हे ही वाचा - मला 'भाई' बोल म्हणत सराईत गुन्हेगाराचा भरचौकात तरुणावर शस्त्राने हल्ला; मुख्य आरोपी फरार