ठाणे - डोंबिवली पूर्वेच्या फडके रोडवरील इमारतीला लागून असणाऱ्या बंद घर वजा गोडाऊनला अचानक आग लागली. या आगीत अर्ध्या तासातच बंद गोडाऊनमधील लाकडी वस्तू पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत.
हेही वाचा - शयित स्कॉप्रियो प्रकरण - पीपीई किट घालून आलेल्या व्यक्तीचा फोटो आला समोर
लाकडी सामानामुळे क्षणार्धातच आगीने रौद्ररूप
डोंबिवली पूर्वेतील फडके रोडवर प्रियदर्शनी नावाची तळ अधिक 1 मजल्याची इमारत आहे. या इमारतीमधील पहिल्या मजल्यावर बंद असलेल्या घरात भंगार असलेल्या लाकडी वस्तूंचे विविध साहित्य ठेवण्यात आले होते. या साहित्याला आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. लाकडी सामानामूळे क्षणार्धातच या आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. तर याच्या शेजारीच असलेल्या इमारतीमध्ये बँक, लॉंड्री आणि ज्वेलर्सची दुकाने होती.
झाडाच्या फांद्या जाळल्याने आग?
आग लागल्याचे समजताच तातडीने या इमारतीसह गलतच्या व्यापाऱ्यांनीही दुकाने बंद करत सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. तर या मजल्यावर राहणाऱ्या सुमेधा कर्वे या कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. अग्निशमन दलाच्या डोंबिवली विभागातील 3 गाड्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी, या इमारतीच्या मागे असणाऱ्या झाडाच्या फांद्या जाळल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा - देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपावर प्रतिक्रिया देण्यास वझेंचा नकार