औरंगाबाद - आईचे दूध बाळासाठी सर्वात ( World Breastfeeding Week ) उपयुक्त आहे, असं डॉक्टर नेहमी सांगतात. मात्र, जागतिक आरोग्य संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार भारतात माता स्तनपानाचे प्रमाण अवघे ५७ टक्के असल्याचं समोर आलं आहे. शासकीय पातळीवर स्तनपानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी अनेक वेळा करण्यात येणारे प्रयत्न कमी पडत असल्याचं दिसून येतं ( Breastfeeding Rate In India is 57 Percent ) आहे.
आईचे दूध सर्वात गुणकारी - आईचे दूध बाळासाठी सर्वात जास्त उपयुक्त आहे. विशेषतः पहिले सहा महिने मिळणाऱ्या दुधामुळे बाळामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढते. ती त्याला त्यांच्या म्हातरापणापर्यंत त्याचे रक्षण करते. बाळ जन्माला आल्यावर पहिले तीन दिवस आईला दूध कमी असते, त्याकाळात चिक निघतो. अवघे काही थेंब असणारा चिक बाळासाठी उपयुक्त असतो. आईच्या दुधात अमृताची ताकद असते ज्यामुळे जुलाब, निमोनिया, अतिसार सारखे आजार बाळाला होत नाहीत. पहिले सहा महिने आईचे दूध सोडून काहीही देऊ नये. त्यानंतर पुढील दीड वर्ष बाहेरील पौष्टिक खाद्यसोबत आईचे दूध दिले तर बाळाला भविष्यात उद्भवणाऱ्या पन्नास टक्के समस्या दूर होतात, अशी माहिती घाटी रुग्णालयाचे प्रसूती विभाग तज्ञ डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी दिली.
बाहेरील दुधाचे होतात आरोग्यावर परिणाम - बाळाचा जन्म झाल्यावर सुरुवातीला काही वेळेस आईला जास्त दूध येत नाही. त्यावेळी बाळाला योग्य प्रमाणात दूध मिळत नाही, असं नातेवाईक किंवा मित्र मंडळी म्हणतात. त्यावेळी बाहेरचं दूध बाळाला दिले जाते. मात्र, हे दूध त्याच्या आरोग्यासाठी घातक ठरते. त्यामुळेच पावडर पासून तयार होणारे दूध देऊ नये, असे निर्देश आरोग्य विभाग देते. इतकंच नाही तर अशा उत्पादनाची जाहिरात करण्यास किंवा त्या डब्यावर लहान मुलांचे चित्र छापण्यास कायद्याने गुन्हा ठरवण्यात आला आहे. तरीही काही डॉक्टर पावडर घेण्याचा सल्ला देत असतील तर त्यांच्यावर कायद्याने गुन्हा दाखल करण्याची तरतूद असल्याची माहिती डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी दिली.
पावडर दुधाचे आहेत दुष्परिणाम - आजच्या आधुनिक युगात आई देखील आधुनिकतेकडे वळली आहे. बाळाला आईचे दूध पाजले तर आरोग्यावर परिणाम होतो, शरीर सुटते, असे समज महिलांना आहे. या गैरसमजामुळे अनेक महिला आई होतात. मात्र, बाळाला दूध पाजण्यासाठी नकार देतात, असं काही सामाजिक संस्थांच्या अभ्यासातून समोर आले आहे. तर, दुसरीकडे पावडर दूध बाळाला दिल्याने त्यांच्यात आजार उद्भवण्याची शक्यता अधिक असते. त्वचारोग सहदुर्मिळ आजार होण्याची दाट शक्यता असते, अशी माहिती डॉ. गडप्पा यांनी दिली.
जनजागृती करूनही पडत नाही फरक - शासन स्तरावर महिलांनी स्तन पान करावं याकरिता जनजागृती केली जाते. अंगणवाडी सेविका, समाजसेवी संस्था यांच्या माध्यमातून गर्भवती महिलांना स्तनपान किती महत्वाचे आहे हे सांगितलं जातं. मात्र, तरी देखील स्तनपान करण्याचे प्रमाण अवघे ५७ टक्के इतके आहे. ही चिंतेची बाब मानली जाते. त्याचे परिणाम बाळाच्या आरोग्यावर आयुष्यभर होऊ शकतो त्यामुळे मातांची स्तनपान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
परिचारिका करतात जनजागृती - औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजेच घाटी रुग्णालयात कर्तव्य बजावणाऱ्या परिचारिका प्रसूती विभागात प्रसूतीसाठी येणाऱ्या मातांना स्तनपानाबाबत माहिती दिली जाते. आई आपल्या बाळाला दूध पाजते म्हणजे त्याची भूक भागवते, असं नाही. तर त्याला जगातील सर्वोत्तम रोगप्रतिकार शक्ती देत आहोत हे सांगितलं जातं आहे. त्याच बरोबर दूध पाजताना ते कसं पाजाव हे देखील मातांना समजून सांगण्याचे काम केले जाते. शासकीय स्तरावर सुरू असलेले प्रयत्न खाजगी रुग्णालयात झाल्यास स्तनपानचे कमी झालेले प्रमाण वाढण्यास नक्की मदत होईल हे नक्की.
हेही वाचा - मातेचे दूध नवजात बाळाला देते सुरक्षा; स्तनपानाचे 'हे' फायदे