ETV Bharat / city

'सुविधा नसलेल्या ठिकाणी शिक्षकांनी स्वत: जाऊन शिकवावं' - वर्षा गायकवाड शाळा सुरू करणेबाबत

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता शाळा सुरू करणे शक्य नाही. त्याचप्रमाणे त्यांचे शैक्षणिक वर्ष सुद्धा वाया जाता कामा नये. ई-संवादाच्या माध्यमांचा प्रभावी वापर करून शिक्षण देण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

वर्षा गायकवाड
वर्षा गायकवाड
author img

By

Published : Aug 16, 2020, 7:57 PM IST

औरंगाबाद - 'ज्या दुर्गम भागात इंटरनेटची सुविधा नसेल किंवा ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन किंवा इतर सुविधा नाहीत, अशा भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा.' अशा सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केल्या आहेत.

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता शाळा सुरू करणे शक्य नाही. त्याचप्रमाणे त्यांचे शैक्षणिक वर्ष सुद्धा वाया जाता कामा नये. ई-संवादाच्या माध्यमांचा प्रभावी वापर करून शिक्षण देण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. कॉंग्रेस पक्षातर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण काळे, अनिल पटेल, इब्राहिम पठाण, सय्यद आक्रम, नामदेव पवार, रविंद्र काळे, सरोज मसलगे, भाऊसाहेब जगताप, कमाल फारुकी यांची प्रमुख उपस्थिती होती.

वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया

हेही वाचा - ..तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संकेत

'कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन विविध माध्यमांद्वारे शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरु आहे. यासाठी सह्याद्री वहिनी, आकाशवाणी, यु-ट्यूब सारखी माध्यमे वापरली जात आहेत. ज्या विद्यार्थ्यांकडे शिक्षणाचे यापैकी कोणतेही साधन उपलब्ध नाही, अशा विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी विद्यार्थीमित्र, शिक्षकमित्र यांच्या माध्यमातून विशेष उपक्रम घेवून शिक्षण देण्यात येत आहे.' अशी माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे. 'मात्र, कोरोना संसर्गामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाणे शक्य नाही. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावे अन् विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे. ज्या ठिकाणी अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, अशा ठिकाणी शिक्षकांनी स्वतः जाऊन सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावा. अशा सूचना देत काही जिल्ह्यांमध्ये स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थी पुढाकार घेऊन गावातील मुलांना शिक्षण देत असल्याचे सांगत गायकवाडांनी त्यांचे कौतूक केले आहे.

वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या, 'ज्या शाळा पालकांकडून ऑनलाईन शिक्षणासाठी सक्तीने शुल्क वसुली करत आहेत. अशा शाळांवर शिक्षण विभागाकडून तातडीने कारवाई करण्यात येईल. शिक्षण विभागाकडे राज्यातून अनेक तक्रारी आल्या होत्या, याबाबत काही शाळांवर कारवाई केली आहे. त्यामुळे खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी मुलांना किंवा पालकांना शुल्क भरण्याबाबत सक्ती करु नये. असा इशाराही त्यांनी दिला आहे.

हेही वाचा - पार्थ पवार भाजपात येत नाही आणि भाजपही त्यांना पक्षात घेत नाही - खासदार गिरीश बापट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.