औरंगाबाद - देशात आणि राज्यात आजही बँकांची संख्या ( PNB Branch Inauguration by Bhagwat Karad ) वाढवण्याची गरज असून, त्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे मत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड ( Bhagwat Karad at Punjab National Bank Branch Inauguration ) यांनी व्यक्त केले. ऑरिक सिटी शेंद्रा येथे पंजाब नॅशनल बँकेच्या शाखा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
हेही वाचा - Raj Thackeray Aurangabad Rally : राज ठाकरेंच्या सभेला अद्यापही परवानगी नाही; मनसेकडून जय्यत तयारी
देशात लवकरच बँकांचा विस्तार - देशात आणि राज्यात लोकसंख्येच्या अनुषंगाने बँक ( Bhagwat Karad news aurangabad ) आणि एटीएम असणे गरजेचे आहे. मात्र, तसे नसल्याने मंत्रिपद मिळाल्यावर बँकांचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. जेणे करून गाव खेड्यातील नागरिकांना सुविधा मिळेल, उद्योग वाढीसाठी, आणि सर्वसामान्य नागरिकांची कामे देखील लवकर होतील, असे मत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केल.
लोकसंख्येच्या तुलनेत देशभरात बँकांच्या शाखांचे जाळे कमी विस्तारलेले आहे. फक्त महाराष्ट्र्रातच बँकांच्या सुमारे ६०० शाखा कमी आहे. पंजाब नॅशनल बँकेसह सार्वजनिक क्षेत्रातील सर्वच बँकांनी मराठवाड्यात सर्वत्र शाखा उघडण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कराड यांनी केले.
पंजाब नॅशनल बँकेच्या शेंद्रा एमआयडीसीतील ऑरिक सिटीमध्ये नव्याने शाखा सुरू केली आहे. बँकेची ही 400 वी शाखा आहे. त्या शाखेचा लोकार्पणाचा सोहळा डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते सोमवारी पार पडला. यावेळी खा. सुजय विखे पाटील, तसेच बँकेचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अतुलकुमार गोयल, झोनल मुख्य कार्यकारी अधिकारी बिभू प्रसाद महापात्रा हेही उपस्थित होते.
मराठवाड्यात वाढणार बँका - लातूर येथे प्रमुख बँकांच्या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यानंतर अनेक बँकांनी शाखाविस्तार सुरू केला. राष्ट्रीय स्तरावर विचार करता एक लाख लोकसंख्येमागे 14 बँक शाखा आणि 18 एटीएम अपेक्षित आहेत. उत्तर प्रदेशात 700 बँक शाखांची कमतरता आहे. महाराष्ट्रात देखील 600 बँक शाखा कमी आहेत. बँकांना प्रत्येक विभागात, मोठ्या गावांत, तालुका स्तरावर आपल्या शाखा सुरू कराव्या लागतील. यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील सर्वच बँकांनी पुढाकार घ्यावा, असा माझा त्यांना आग्रह आहे. बँकांना त्यांच्या शाखा विस्तारासाठी मदत व्हावी याअनुषंगाने चर्चा करण्यासाठी लवकरच सावर्जनिक क्षेत्रातील 12 प्रमुख बँकांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार असल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले.
हेही वाचा - St bus Caught fire in Ajanta Ghat : जगप्रसिद्ध अजिंठा घाटात एसटी बसने घेतला पेट, जीवितहानी टळली