ETV Bharat / city

शहरातील दोन तरुणींची एकाच दिवशी आत्महत्या; परिसरात खळबळ - पुंडलिकनगर

शहरातील दोन विविध घटनेत दोन तरुणींनी आत्महत्या करुन आपले जीवन संपवले. या तरुणींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

घाटी रुग्णालय
author img

By

Published : May 24, 2019, 2:07 PM IST

औरंगाबाद - शहरातील दोन तरुणींनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. गौरी सुशील खवसे ( वय 23 वर्ष ) आणि पूनम अर्जुन वाघाळे ( वय 15 वर्ष ) असे आत्महत्या केलेल्या तरुणींची नावे आहेत. यातील अल्पवयीन असलेल्या पूनमने भारत नगरात तर गौरीने गारखेडा परिसरातील घरी गळफास घेऊन जीवन संपवले. या दोन्ही घटनेची नोंद पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

घाटी रुग्णालय आणि पुंडलीक नगर पोलीस ठाणे

गौरी खवसे ही तरुणी आपल्या आई-वडिलांसोबत गारखेडा परिसरातील मधुराज हाउसिंग सोसायटीत राहत होती. सध्या ती अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेत होती. तिसऱ्या वर्षातील काही विषयांमध्ये ती नापास झाली होती. त्या विषयांची 22 मे रोजी तिने परीक्षा दिली. गुरुवारी नेहमीप्रमाणे रात्री आईसोबत गौरी बाहेर फिरण्यासाठी देखील गेली होती. बाहेरून आल्यावर रात्री दुसऱ्या मजल्यावरील खोलीत अभ्यास करते म्हणून गौरी वरच्या खोलीत गेली. मात्र आज सकाळी आईने गौरीला हाक मारली असता, तिने प्रतिसाद दिला नाही. आईने दरवाजा वाजविला तरीदेखील प्रतिसाद मिळत नसल्याने, दरवाजा तोडून आतमध्ये पाहिले असता, गौरीने छताच्या लोखंडी रॉडला ओढणीने गळफास घेतल्याचे दिसून आले. ही माहिती पुंडलिक नगर पोलिसांना कळविली असता, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नातेवाईकांच्या मदतीने गौरीला बेशुद्ध अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.

दुसर्‍या घटनेत पूनम वाघाळे या अल्पवयीन तरुणीने चुलत्याच्या घरी लोखंडी रॉडला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पूनमने यावर्षी दहावीची परीक्षा दिली आहे. ती उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये चुलत्याला भेटण्यासाठी औरंगाबाद येथे दोन दिवसांपूर्वीच आली होती. गुरुवारी चुलतीसोबत पूनमदेखील शहरात फेरफटका मारण्यासाठी गेली होती. रात्री फेरफटका मारून पूनम वेगळ्या खोलीत झोपण्यासाठी गेली होती. आज सकाळी चुलतीने पूनमला आवाज दिला असता, तिने प्रतिसाद दिला नाही. अखेर चुलत्याने दरवाजा तोडून आतमध्ये पाहिले असता, तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. या दोन्ही आत्महत्येच्या घटनेचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. शवविच्छेदन करण्यासाठी दोघींचे मृतदेह घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. पुढील तपास पुंडलिकनगर पोलीस करत आहेत.

Intro:गारखेडा परिसरातील मधुराज हाउसिंग सोसायटी येथील 23 वर्षीय तरुणीने व मुकुंदवाडी परिसरातील भारत नगर येथील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली आहे. या दोन्ही घटनेची नोंद पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.पोलीस अधिक तपास करीत आहेत
गौरी सुशील खवसे (वय 23 वर्षे, रा. मधुराज कॉलनी, गारखेडा) व पुनम अर्जुन वाघाळे (वय १५ वर्षे, रा. भारत नगर) असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या तरुणींची नावे आहेत.

Body: २३ वर्षीय गौरी खवसे ही तरुणी आपल्या आई
-वडिलांसोबत गारखेडा परिसरातील मधुराज हाउसिंग सोसायटी येथे राहत होती. सध्या ती इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होती. तिसऱ्या वर्षातील काही विषयांमध्ये नापास झाली होती. त्या विषयांची 22 मे रोजी तिने परीक्षा दिली. काल नेहमी प्रमाणे रात्री आईसोबत बाहेर फिरण्यासाठी देखील गेली होती. बाहेरून आल्यावर रात्री दुसऱ्या मजल्यावरील खोलीत अभ्यास करते म्हणून गौरी वरच्या खोलीत गेली. मात्र आज सकाळी आईने गौरीला हाक मारली असता तिने प्रतिसाद दिला नाही आईने दरवाजा वाजविला तरीदेखील प्रतिसाद मिळत नसल्याने.दरवाजा तोडून आत मध्ये पाहिले असता गौरीने छताच्या लोखंडी रॉडला ओढणीच्या साह्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. ही माहिती पुंडलिक नगर पोलिसांना कळविली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नातेवाईकांच्या मदतीने गौरीला बेशुद्ध अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तर दुसर्‍या घटनेत पूनम वाघाळे या 15 वर्षीय अल्पवयीन तरुणीने चुलत्याच्या घरी लोखंडी रॉडला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पुनम वाघाळे हिने यावर्षी दहावीची परीक्षा दिली आहे. ती उन्हाळ्याच्या सुट्ट्या मध्ये चुलत्याला भेटण्यासाठी औरंगाबाद येथे दोन दिवसांपूर्वीच आली होती. काल चुलति सोबत पुनम देखील शहरात फेरफटका मारण्यासाठी गेली होती. रात्री फेरफटका मारून पुनम वेगळ्या खोलीत झोपण्यासाठी गेली होती. आज सकाळी चुलती ने पूनमला आवाज दिला असता तिने प्रतिसाद दिला नाही. अखेर चुलत्याने दरवाजा तोडून आत मध्ये पाहिले असता तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. . या दोन्ही आत्महत्येच्या घटनेचे कारण स्पष्ठ होऊ शकले नाही.शवविच्छेदन करण्यासाठी दोघींचे मृतदेह घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.