ETV Bharat / city

Friendship Day in Politics : मैत्री दिनालाच दोन मित्र झाले राजकीय विरोधक; एक सेनेचा तर एक शिंदे गटाचा महानगर प्रमुख

author img

By

Published : Aug 8, 2022, 7:08 AM IST

जगभर मैत्री दिन साजरा होत असताना इकडे औरंगाबादच्या राजकारणात दोन मित्र एकमेकांच्या विरोधात उभे राहिले असल्याचे पाहायला मिळाले. आमदार प्रदीप जैस्वाल ( Shinde Group MLA Pradeep Jaiswal ) हे शिंदे गटात सहभागी झाल्याने शिवसेनेने महानगर प्रमुख पदावरून ( Shiv Sena Post of Metropolitan Chief ) त्यांची हकालपट्टी करीत, त्यांच्या जागी त्यांचेच मित्र असलेले किशनचंद तनवाणी ( Former MLA Kishanchand Tanwani ) यांना महानगर प्रमुखपदी बसवले आहे. त्यामुळे येणाऱ्या आगामी काळात दोन मित्र आमने-सामने पाहायला मिळणार आहेत.

Pradeep Jaiswal and Kishan Chand Tanwani
आ. प्रदीप जैस्वाल आणि माजी आ. किशनचंद तनवाणी

औरंगाबाद : मैत्री दिन साजरा होत असताना जिल्ह्याच्या राजकारणात एका मित्राचे पद काढून दुसऱ्याला देण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय आखाड्यात दो दोस्त अमाने-सामने, अशी स्थिती निर्माण झाली असून, दोघांचे लक्ष आहे मिशन महानगर पालिका. हे दोन मित्र दुसरे-तिसरे कोणी नसून, शिंदे गटातील बंडखोर आ. प्रदीप जैस्वाल आणि माजी आ. किशनचंद तनवाणी ( Former MLA Kishanchand Tanwani ) हे आहेत. त्यामुळे मैत्री दिनाला ( Shiv Sena Post of Metropolitan Chief ) या दोघांची चर्चा चांगलीच रंगली असल्याचे पाहायला मिळत आहे.

किशनचंद तनवाणी यांची नियुक्ती : शिवसेनेच्या महानगर प्रमुखपदी शिंदे समर्थक आमदार प्रदीप जैस्वाल नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या बंडानंतर त्यांची पदावरून हकालपट्टी करून ते पद त्यांचे जुने जवळचे मित्र किशनचंद तनवाणी यांना देण्यात आले. शिवसेनेतर्फे जिल्ह्यातील ही दुसरी हकालपट्टी आहे. या आधी आ. संजय शिरसाट यांचे समर्थक आणि युवासेनेचे पदाधिकारी असेलल्या राजेंद्र जंजाळ यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर आता ही दुसरी कारवाई सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

निवडणुकीत मित्र झाले विरोधक : किशनचंद तनवाणी आणि प्रदीप जैस्वाल दोघेही जुने मित्र आणि शिवसेना स्थापनेपासून सक्रिय कार्यकर्ते. मात्र, राजकारणात काहीही होऊ शकते, असे म्हणतात आणि तसेच या दोन मित्रांमध्ये झाले. २०१४ सालच्या निवडणुकीत सेना-भाजपची युती तुटली. मध्य विधानसभा मतदारसंघात सेनेचे विद्यमान आ. प्रदीप जैस्वाल यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. त्यांच्याविरोधात भाजपने किशनचंद तनवाणी यांना सेनेतून वेगळे करीत उमेदवारी दिली. दोन मित्र एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढले. मतांचे विभाजन झाले आणि दोघेही पराभूत झाले. आणि एमआयएमचे नवखे उमेदवार इम्तियाज जलील निवडून आले.

तनवाणी होते पदाच्या प्रतीक्षेत : निवडणुकीत पराभूत झाल्यावर भाजपने त्यांना शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली. मात्र, सेनेच्या कार्यपद्धतीत राजकारणाचे बाळकडू घेतलेले तनवाणी तिथे रमले नाही. प्रदीप जैस्वाल यांनी तनवाणी यांना परत आणले. शिवसेनेत परत येत असताना त्यांना चांगले पद दिले जाईल, असे आश्वासन देण्यात आले. मात्र, अंतर्गत विरोधामुळे मागील अडीच वर्षांपासून तनवाणी पदाच्या प्रतीक्षेत राहिले.

शिवसेनेने तनवाणी यांना केले महानगर प्रमुख : प्रदीप जैस्वाल यांच्या बंडानंतर तनवाणी सोबत जातील असे वाटत होते. मात्र, त्याच वेळी शिवसेनेने जैस्वाल यांची हकालपट्टी करीत त्या जागी किशनचंद तनवाणी यांना महानगर प्रमुख केले. तर इकडे शिंदे गटाने क्षणाचा विलंब न करता प्रदीप जैस्वाल यांची महानगर प्रमुखपदी नियुक्ती केली. आता एकच पक्षात असणाऱ्या दोन मित्रांवर एकमेकांच्या विरोधात उभे राहण्याची वेळ आली आहे.

दोन्ही मित्रांचे एकच लक्ष : दोन्ही मित्र एकमेकांच्या विरोधात उभे आहेत ते एकच लक्ष घेऊन. दोघांचेसुद्धा औरंगाबाद महापालिका एवढं लक्ष असल्याने आता येणाऱ्या निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. त्यात दोघांनी एकच लक्ष केले ते म्हणजे महानगर पालिका. त्यामुळे ऐन "मैत्री दिनी" दोन मित्रांमध्ये आपल्या पक्षाच्या भूमिकांमुळे एक भिंत उभी केली गेली आता यात कोण बाजी मारणार हे तर येणारा काळच सांगेल.

कोण आहेत प्रदीप जैस्वाल पाहुया : १९८८ मध्ये पहिल्यांदा नगरसेवक झाले. सन १९९० मध्ये औरंगाबाद महापौरपदी निवड त्यांची निवड झाली. पुढे ते १९९२ ला शिवसेना औरंगाबाद शहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. परत १९९५ मध्ये दुसऱ्यांदा नगरसेवक झाले. साल १९९६ मध्ये लोकसभा लढवली आणि पहिल्यांदा खासदार औरंगाबादचे खासदार झाले. शिवसेनेने २००६ मध्ये त्यांची जिल्हाप्रमुखपदी निवड केली. २००९ शिवसेनेशी बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली आणि विजय झाले. विधानसभा २०१४ च्या निवडणुकीत एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्याकडून पराभव त्यांना पत्करावा लागला. २०१५ ला शिवसेना महानगरप्रमुखपदी निवड करण्यात आली. विधानसभा २०१९ ला पुन्हा आमदार म्हणून निवडून आले.

कोण आहेत किशनचंद तनवाणी पाहुया : पहिल्यांदा १९९५ मध्ये म्हाडा सभापती म्हणून काम पाहिले. त्यानंतर साल २००० मध्ये पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. २००५ मध्ये औरंदाबादचे महापौर झाले. २००७ मध्ये विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. २०१४ मध्ये भाजपकडून विधानसभेसाठी उमेदवारी मात्र पराभव त्यांचा पराभव झाला. २०१६ मध्ये भाजप शहराध्यक्ष निवड करण्यात आली. भाजपातील अंतर्गत नाराजीमुळे शिवसेने प्रवेश केला.

औरंगाबाद महापालिकेतील चुरस : औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी गेल्या वेळी किशनचंद तनवाणी हे भाजपचे शहराध्यक्ष होते. त्यांच्या निवडणूक लढविण्याच्या कार्यपद्धतीचा भाजपला लाभच झाला होता. मात्र, पुढे तनवाणी यांना भाजपने कोणतेही मोठे पद दिले नाही. विधान परिषदेवर नियुक्ती न मिळाल्याने ते भाजपावर नाराज होते. महाविकास आघाडी कार्यकाळात ते पुन्हा शिवसेनेमध्ये परतले. त्यांच्या गाठीशी असलेला राजकारणातला अनुभव तितकाच दांडगा आहे. याच अनुभवाच्या जोरावर त्यांना शिवसेनेकडून ही जबाबदारी मिळाली आहे. एमआयएमचे समोर आव्हान असताना शिवसेना आणि भाजपच्या मतांची विभागणी होण्याचाही धोका या मतदारसंघात आहे. पण किशनचंद तनवणी या सगळ्यावर एक प्रभावी पर्याय ठरू शकतात, असं राजकीय विश्लेषक सांगतात

हेही वाचा : Nilesh Rane : दीपक केसरकरांनी आपल्या औकातीत रहावं, अन्यथा...; निलेश राणेंचा थेट इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.