ETV Bharat / city

Ganeshotsav 2022 गणेशोत्सवासाठी दीड लाख विद्यार्थ्यांना शाडू मातीच्या मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण, दीपशिखा फाउंडेशनचा पुढाकार - शाडू मातीच्या मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण

पर्यावरण संरक्षणासाठी अनेक प्रयत्न केले जातात. त्यात गणेश उत्सवात Ganeshotsav 2022, गणेश मूर्तींपासून पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवण्यासाठी दीपशिखा फाउंडेशन initiative Deepshikha Foundation, गेल्या अकरा वर्षांपासून काम करत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जवळपास दीड लाख विद्यार्थ्यांना Training of one and a half lakh students शाडू मातीच्या मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण making shadu clay idols संस्थेच्या अध्यक्ष मनीषा चौधरी President Manisha Chaudhary यांनी दिले.

Ganeshotsav 2022
दीपशिखा फाउंडेशन
author img

By

Published : Aug 24, 2022, 6:25 PM IST

Updated : Aug 25, 2022, 1:15 PM IST

औरंगाबाद पर्यावरण संरक्षणासाठी अनेक प्रयत्न केले जातात. त्यात गणेश उत्सवात Ganeshotsav 2022, गणेश मूर्तींपासून पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवण्यासाठी दीपशिखा फाउंडेशन initiative Deepshikha Foundation, गेल्या अकरा वर्षांपासून काम करत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जवळपास दीड लाख विद्यार्थ्यांना Training of one and a half lakh students शाडू मातीच्या मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण making shadu clay idols संस्थेच्या अध्यक्ष मनीषा चौधरी यांनी दिले.

प्रतिक्रिया देतांना दीपशिखा फाउंडेशनच्या अध्यक्ष मनीषा चौधरी

शाळांमध्ये राबवला जातोय उपक्रम असे म्हणतात की, लहान मुलांना एकदा शिकवलेली गोष्ट ते कायम स्मरणात ठेवतात. त्यामुळेच पर्यावरण वाचवण्यासाठीचा प्रयत्न या विद्यार्थ्यांपासून सुरू करण्यात आला आहे. दरवर्षी सण साजरा होत असतांना, अनेक गोष्टी पर्यावरणाला घातक अशा होतात. विशेषतः गणेश मूर्ती तयार करताना प्लास्टर ऑफ पॅरिसचा होणारा वापर आणि त्यामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. याच बाबी लक्षात घेता दीपशिखा फाउंडेशनने शाळांमध्ये जाऊन उपक्रम राबवण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यामध्ये फाउंडेशनचे अध्यक्ष मीना मनीषा चौधरी या स्वतः लहान मुलांना मूर्तींमुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आणि पर्यावरण पूरक गणेश उत्सव कसा साजरा करायचा याबाबत माहिती देण्याचे काम त्या दरवर्षी नित्य नियमाने करतात.

शाडू मातीच्या गणपती तयार करण्याचे प्रशिक्षण गणेश उत्सवामध्ये पर्यावरण संरक्षण व्हावे, यासाठी शाडू मातीचे गणपती घरात स्थापन करावे, यासाठी दीपशिखा फाउंडेशन प्रयत्न करत आहे. इतकेच नाही तर दरवर्षी गणेश उत्सवाच्या पंधरा दिवस आधीपासून विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शाडू मातीचे गणपती तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. त्यासाठी विशेष सूचना आधीच देण्यात येतात. विद्यार्थ्यांना स्वतःच्या हाताने तयार केलेला गणपती घरात स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले जातात. इको फ्रेंडली गणेश उत्सवाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगतात. इतकेच नाही तर गणपतीसाठी वापरण्यात येणारे रंग देखील पर्यावरण पूरक कसे वापरावे याचे प्रशिक्षण दिले जाते. अशी माहिती मनीषा चौधरी यांनी दिली.

भविष्यात घडतील पर्यावरण प्रेमी लहान मुलांपासून सुरू केलेली मोहीम कायम उपयोगी पडेल, असा विश्वास दीपशिखा फाउंडेशने व्यक्त केलाय. त्यामुळेच शाळांमधील विद्यार्थ्यांना इको फ्रेंडली गणेशोत्सवाबाबत जनजागृती करण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. आता पर्यंत दीड लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तर काही ठिकाणी नागरिकांना देखील प्रशिक्षण देण्यात आले आहे. लहान मुलांना शिकवलेली गोष्ट कायम स्मरणात राहील. त्यातून पर्यावरण प्रेमी तयार होतील, जेणे करून भविष्यात पर्यावरण वाचवण्यात मदत होईल असा विश्वास मनीषा चौधरी यांनी व्यक्त केला.

हेही वाचा Dagdusheth Ganpati Trust असा आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा इतिहास, जाणून घ्या

Last Updated : Aug 25, 2022, 1:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.