औरंगाबाद - 16 वर्षीय भोळसर मुलाचे कोरोनाने निधन झाल्याचा बनाव केला. आपल्याच सावत्र बापाने मुलाला भीक मागायला लावल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबाद येथे समोर आला आहे. हा मुलगा चक्क घाटी रुग्णालयाजवळ भीक मागत होता. मित्रांच्या मदतीने त्याला पुन्हा पालकांकडे सोडण्यात आले.
असा उघडकीस आला प्रकार
मुलगा राहत असलेल्या परिसरातील हाफिज शेख, अमोल शेवनकर, शुभम दुसांगे हे कामानिमित्त घाटी रुग्णालयात गेले होते. त्यावेळी त्यांना 16 वर्षीय हा मुलगा भीक मागत असल्याचे दिसले. त्यांनी त्याच्यासोबत बोलून, घरी येण्याबद्दल विनंती केली. मात्र मला घेण्यासाठी आई येत आहे. मी तिची वाट बघत आहे, असे सांगत घरी जाण्यास मुलाने नकार दिला. या बाबत नागरिकांनी मुलाच्या घरी जाऊन तुमचा मुलगा कोरोना मृत झाला नसून तो घाटी परिसरात भीक मागून जगत असल्याचे आई-वडिलांना सांगितले. मात्र, आमच्या मुला सारखा दिसणारा दुसराच कोणी मुलगा असेल असे सांगून त्यांनी मुलाला घेऊन येण्यास टाळाटाळ केली.
पोलिसांच्या धाकाने मुलाला आणले परत
आई वडिलांनी मुलाला आणण्यास उदासीनता दाखवल्याने नागरिकांनी एकत्र येऊन, याबाबत पोलिसांना माहिती देऊ अशी धमकी दिली. त्यानंतर मुलाला घाटी परिसरातून आणले गेले. सोबतच्या नागरिकांनी मुलासह बापाला पोलीस ठाण्यात नेले. पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी मुलाला यापुढे व्यवस्थित सांभाळण्याची बापाला तंबी दिली आता अशी चूक होणार नाही असा विश्वास नराधम सावत्र पित्याने दिला.
हेही वाचा - Women Doped For Marriage In Thane : लग्नाचे आमिष दाखवत 26 महिलांची अडीच कोटीने फसवणुक करणारा लखोबा अटकेत