ETV Bharat / city

सासऱ्याकडून उकळले दहा लाख अन् पत्निला दिले बनावट नियुक्तीपत्र, गुन्हा दाखल - जिन्सी पोलीस ठाणे

पत्नीला नोकरी लावण्यासाठी जावयाने सासऱ्याकडून दहा लाख रुपये घेतले. पत्नीने पतीला नोकरीबाबत विचारण्या केल्यानंतर पतीने तिला चक्क बनावट नियुक्तीपत्र दिले. ही बाब पत्नीला समजल्यानंतर तिचा छळ सुरू केला. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

म
author img

By

Published : Sep 15, 2021, 9:12 PM IST

औरंगाबाद - लग्न जुळविताना नववधुला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सासरच्या मंडळींनी दहा लाख उकळले. लग्नानंतर विवाहितेने नोकरीसाठी तगादा लावल्यावर चक्क पतीनेच तिला एका महाविद्यातील नियुक्तीची बोगस नियुक्तीपत्र आणून दिले. हा प्रकार उघडकीस आल्यावर त्यांच्यात भांडण झाले. आता सासरच्या मंडळींनी विवाहितेला घरातून हाकलून दिले आहे, असा आरोप पीडितेने केला आहे. पीडितेच्या तक्रारीवरुन जिन्सी ठाण्यात कौटुंबिक छळ व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक

पती रोहीत जगन्नाथ पोतराजे (वय 29 वर्षे), सासू सुमित्रा जगन्नाथ पोतराजे (वय 48 वर्षे), चुलत सासू चंद्रकला छगन पोतराजे (वय 50 वर्षे), दिर राहुल जगन्नाथ पोतराजे (वय 31 वर्षे, सर्व रा. संग्रामनगर, जालना), अशी आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दत्त नगरातील 27 वर्षीय सायलीने (नाव बदलले आहे) बी.ई. सिव्हिलपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. लग्नापूर्वी ती शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय अंबड येथे तासिका तत्त्वावर नोकरीला होती. दरम्यान, वधू-वर परिचय मंडळातर्फे पीडितेच्या आई-वडिलांची सुमित्रा पोतराजेशी मार्च, 2021 मध्ये ओळख झाली. त्यांनी रोहितसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. लग्नाची बोलणी सुरू असताना पीडितेला नोकरी लावून द्यावी लागेल, अशी अट घालण्यात आली. तेव्हा नोकरी मिळणे एवढे सोपे नाही, असे सांगितल्यावर त्यांनी दहा लाख रुपये द्या, आम्ही तिच्या नोकरीचे पाहतो, असे पोतराजे कुटुंबीयांनी पीडितेच्या कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतर पीडितेच्या वडिलांनी टप्प्या-टप्प्याने दहा लाख रुपये दिले. 5 मे, 2021 रोजी लक्ष्मण चावडी येथे पीडितेचे लग्न झाले. लग्नात पीडितेच्या आई-वडीलांनी संसारोपयोगी सर्व वस्तू व साहित्य दिले होते. लग्नानंतर पीडिता संग्रामनगर, जालना येथे नांदण्यासाठी गेली. पंधरा दिवसानंतर पीडितेने पतीकडे नोकरीबाबतची चौकशी केली. त्यानंतर काही दिवसांनी पतीने पीडितेला एका महाविद्यालयाचे नियुक्तीपत्र दिले. त्यावर पीडितेला शंका आल्यामुळे तिने महाविद्यालयात जाऊन येते, असे सांगितले. त्यानंतर पतीने नियुक्तीपत्र बनावट असल्याचे सांगून पीडितेस छळ करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर सासरच्या मंडळींनी तिला मारहाण करून घरातून हाकलून दिले. पीडितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी अनेकदा याबाबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सासरच्या मंडळींनी काहीही थारा दिला नाही. त्यानंतर जिन्सी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक अनंत तांगडे करत आहेत.

हेही वाचा - तुझ्यासारखी महिला शोधून दे म्हणत मद्यपिचा राडा, नागरिकांकडून मिळाला चोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.