ETV Bharat / city

औरंगाबादमध्ये बॅनर वॉर; भाजपच्या पाणी प्रश्नाच्या बॅनर शेजारी शिवसेनेचा गॅस दरवाढीबाबत बॅनर, वादंगाची शक्यता - शिवसेना बॅनरबाजी औरंगाबाद

पाण्याच्या प्रश्नावर शहरातील राजकीय वातावरण तापले असताना बॅनर वॉर चर्चेचा विषय बनला आहे. भाजप तर्फे आंदोलनविषयक बॅनर लावलेल्या ठिकाणी सेनेने देखील बॅनर लावून कुरघोडीचा प्रयत्न केला आहे.

Shiv Sena bjp banner war Aurangabad
भाजप पाणी बॅनगर औरंगाबाद
author img

By

Published : May 23, 2022, 11:12 AM IST

Updated : May 23, 2022, 12:17 PM IST

औरंगाबाद - पाण्याच्या प्रश्नावर शहरातील राजकीय वातावरण तापले असताना बॅनर वॉर चर्चेचा विषय बनला आहे. भाजप तर्फे आंदोलनविषयक बॅनर लावलेल्या ठिकाणी सेनेने देखील बॅनर लावून कुरघोडीचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा - NCP Ghagar Agitation Aurangabad : भाजपाच्या आंदोलनापूर्वीच राष्ट्रवादीचे 'घागर आंदोलन'

भाजप बरोबर सेनेचे बॅनर - शहरातील नागरिकांना पाणी मिळत नसल्याने सेनेसोबत 30 वर्षे सत्तेत असलेल्या भाजपने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली. मात्र, त्याच बॅनरच्या बाजूला सेनेने बॅनर लावले आहेत. या बॅनरवर 'आम्ही पाणी पट्टी अर्धी केली, तुम्ही गॅसचे दर अर्धे करून दाखवा' अशी मागणी केली आहे. त्यामुळे, पाण्याच्या स्थानिक मुद्द्यावरून सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या इंधर दरवाढीवर सेनेने प्रश्न उपस्थित केले आहेत.

खैरे यांच्यावर भाजपने फोडले खापर - मागील तीस वर्षे युतीत सत्ता उपभोगणारा भाजप पाणी प्रश्नावर आंदोलन करत असल्याने टीका केली जात आहे. मात्र, महानगर पालिकेत निर्णय घेताना माजी खासदार चंद्रकांत खैरे निर्णय घेऊ देत नव्हते, असा आरोप केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी केला आहे. त्यावर खैरे यांनी उत्तर देत, मी खासदार होतो, त्यामुळे मनपामध्ये लक्ष देण्याचा प्रश्नच येत नाही, असे म्हटले. यावरून आता पाणी प्रश्नावर मोठा वादंग निर्माण होणार असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा - Aurangzeb Tomb Controversy : 'औरंगाबाद शहराचे नाव बदलाल!, मात्र पुऱ्यांचे, वास्तूंची नावे कसे बदलणार?'

Last Updated : May 23, 2022, 12:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.