नागपूर - लोकसभा अध्यक्षानी ( Speaker of the Lok Sabha ) जे काही खुलासा केला आहे त्यात अजून काही शब्दला बंदी लावली नाही. त्यात काय निर्णय आहे ते आम्ही दिल्लीत गेल्यावर बोलू. यात नेमके काय आहे सर्वच राजकीय दलाशी चर्चा करून ( discussing with all political parties ) ठरवू त्यानंतर बघू काय निर्णय आहे त्यात काय सत्य आहे. असे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( NCP President Sharad Pawar ) म्हणाले ते एका कार्यक्रमासाठी नागपुरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकांशी संवाद साधला. औरंगाबादच्या नामांतराविषयी बोलताना पवार म्हणाले, की हा राज्यसरकारचा विषय आहे त्यांना त्यांना विचारा असे म्हणत त्यांनी नामानतंर विषयावर बोलणे टाळले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील ( NCP leader Dilip Valse Patil ) यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यातील शिंदे-भाजप सरकारवर पवारांची टीका - राज्यात अस्तित्वात आलेल्या एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारकडून महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय एक-एक करून बदलले जात आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली आहे. पुर्वीच्या सरकारने घेतलेले निर्णय बदलून आपण काहीतरी करून दाखवल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. सरकारने नवीन काही करून दाखवल असते तर मी त्यांचे अभिनंदन केले असते. फक्त निर्णय रद्द करून काय साध्य होत आहे, असा प्रश्न राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( NCP President Sharad Pawar ) यांनी उपस्थित केला आहे.
तीनही पक्ष मिळून निवडणूक लढवू' : आगामी पुढच्या काळात होऊ घातलेली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येऊन लढवावी, अशी इच्छा मी आधीच व्यक्त केली आहे. तशीच इच्छा आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील बोलून दाखवली आहे, तसे झाल्यास चित्र नक्की बदलेल, या करिता तीनही पक्ष एकत्र येऊन निर्णय घेऊ, असे शरद पवार म्हणाले आहेत. नवीन सरकार स्थापन होऊन आता बरेच दिवस झाले आहे, तरी देखील मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. एकीकडे राज्यात पूर्ण परिस्थिती आहे तर दुसरीकडे विभागांना मंत्रीच नसल्यामुळे जनतेचे हाल होत आहे, असा आरोप शरद पवार यांनी केला आहे.
'अर्थव्यवस्था सांभाळणे केंद्र जबाबदारी' : देशाची अर्थव्यवस्था सांभाळणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था कशाप्रकारे बळकट होईल, या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज असल्याचा देखील ते म्हणाले आहे.
हेही वाचा : Shiv Sena leader Sanjay Raut in Nagpur : हे सरकार हिंदुत्वद्रोही; खरे मुख्यमंत्री फडणवीसच-संजय राऊत